गोव्यातील कंपनीकडून सुपरफास्ट इलेक्ट्रिक बाइक लाँच; फक्त या चार राज्यात होणार विक्री

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

गोव्यातील स्टार्टअप कबीरा मोबिलिटीने भारतात केएम 3000 आणि केएम 4000 नावाच्या पहिल्या इलेक्ट्रिक मोटारसायकली लाँच केल्या आहेत.

गोव्यातील स्टार्टअप कबीरा मोबिलिटीने भारतात केएम 3000 आणि केएम 4000 नावाच्या पहिल्या इलेक्ट्रिक मोटारसायकली लाँच केल्या आहेत. कंपनीने KM3000 आणि KM4000 या दोन नव्या ई-बाईक मार्केटमध्ये आणल्या आहेत.

या बाईकला 4.0 केडब्ल्यूएच आणि 4.4 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी आहेत ज्या बूस्ट चार्जसह 50 मिनिटांत 0-80 टक्के चार्ज होवू शकतात. कंपनीचा इको चार्जर मोड वापरल्यास 6 तास 30 मिनिटे लागू शकतात. आता केएम3000 ही बाईक 100 किमी प्रतिचा आणि केएम 4000 ही बाईक120 किमी प्रति तासाचा अ‍ॅव्हरेज देणार आसल्याचा दावा कंपनीने केला आहे. या बाईकच्या फीचर्स लिस्टमध्ये ब्लूटूथ, इन्स्ट्रुमेंट, क्लस्टर आणि एलईडी लाइटिंगचा समावेश आहे. या दोनपैकी KM4000 ही भारतातील आतापर्यंतची सर्वात फास्ट इलेक्ट्रिक बाइक असल्याचे म्हटले जात आहे.

KM3000 या बाइकमध्ये कंपनीने 4kWh बॅटरीचा वापर केला असून सोबत BLDC आहे. ही बाइक एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर इकॉनॉमी मोडमध्ये 120KM ची अ‍ॅव्हरेज  देते, तर स्पोर्ट्स मोडमध्ये 60km ची अ‍ॅव्हरेज देवू शकते. तर, KM4000 या बाइकमध्ये कंपनीने 4.4kWh ची बॅटरी आणि 8kW चे इंजिन दिले आहे. 120KM प्रति तास या KM4000 बाइकचा टॉप स्पीड आहे.  ईको मोडमध्ये KM4000 ही बाईक 150 किमी प्रवास करु शकते. तर स्पोर्ट्स मोडमध्ये KM4000 ही बाइक 90 किमीचा प्रवास करु शकते. सध्या या कबिरा मोबिलिटी कंपनीचे भारतात दोन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत. यातील एक प्लांट्स गोव्यात आहे तर दुसरा कर्नाटकमधील धारवाडमध्ये आहे. दोन्ही बाइकमध्ये दिलेल्या पॉवर आणि चार्जिंगमध्ये बॅटरी 2 तास 50 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते. तर, बूस्ट चार्ज केल्याने 50 मिनिटात पूर्ण चार्ज होऊ शकते. 

किती आहे किंमत?

KM3000 या ई-बाईकची कबिरा मोबिलिटीने एक्स-शोरुम किंमत 1 लाख 26 हजार 990 रुपये ठेवली आहे. तर, KM4000 या बाईकची एक्स-शोरुम किंमत 1 लाख 36 हजार 990 रुपये आहे. कबीरा मोबिलिटीचे म्हणणे आहे की ते गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमधील अशा 27 शहरांमध्ये या दोन मॉडेल्सची विक्री केली जात आहे. 

संबंधित बातम्या