फोंड्यात ऑनलाईन शिकवणी वर्गात अश्‍लिल चित्रे झाली डाऊनलोड

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

ऑनलाईन शिकवणीच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांकडून आणि शिकवणीचे मोबाईल ‘लिंक’ सापडत असल्याने मोबाईलद्वारे भलतेच प्रकार केले जात असल्याचे समोर आले आहे.

फोंडा: कोरोनामुळे ऑनलाईन शिकवणी वर्गात काही ठिकाणी नेट नसल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांमधील संवाद तुटत असल्याच्या तक्रारी आहेत, तर काही पालकांकडून विद्यार्थी कायम मोबाईलशी जोडला जात असल्याने विद्यार्थ्याच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर आता या ऑनलाईन शिकवणीच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांकडून आणि शिकवणीचे मोबाईल ‘लिंक’ सापडत असल्याने मोबाईलद्वारे भलतेच प्रकार केले जात असल्याचे समोर आले आहे. फोंड्यातील एका उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्याने या प्रकरणी फोंडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

फर्मागुढी-फोंड्यात गेल्या शनिवारी १९ रोजी एका उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावीचे ऑनलाईन वर्ग सुरू असताना अचानकपणे सर्वांच्या मोबाईलवर अश्‍लिल चित्रे डाऊनलोड झाली. ही चित्रे पाहून विद्यार्थी आणि शिकवणी घेणारी शिक्षिकाही बावरली. नेमका काय प्रकार झाला ते सुरवातीला कुणाच्याही लक्षात आले नाही. मात्र, शिक्षणासारख्या पवित्र प्रांगणात अशाप्रकारे अश्‍लिल चित्रे खुले आम डाऊनलोड झाल्याने मुलांत आणि शिक्षिकेत गोंधळ निर्माण झाला. 

या शिक्षिकेने हा प्रकार लगेच प्राचार्याच्या कानावर घातला आणि त्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोचले. नेमका हा प्रकार कुणी व कसा केला याचा शोध सध्या पोलिस घेत आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या