Goa: पणजी मनपा व दुकानदार यांच्यातील संघर्ष पेटणार

लीव्ह ॲण्ड लायसन्स नको, लीज करारच पाहिजे; दुकानदारांची मागणी (Goa)
Panjim Municipal Market (Goa)
Panjim Municipal Market (Goa)Dainik Gomantak

Panjim: पणजी मर्केटमधील (Panjim Municipal Market) दुकाने वाटपात १२ वर्षापुर्वी झालेला घोळ निस्तारण्यासाठी महापालिकेने (Panjim Municipal Corporation) दुकानदारांशी लीव्ह अँड लायसन्स करार (Leave and License Agreement) करण्याची प्रक्रिया सुरु करुन जे दुकानदार करार करण्यास तयार नाहीत त्यांना बेदखल करण्याच्या नोटीसी काढण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे काही झाले तरी आम्हांला लीव्ह ॲण्ड लायसन्स करार नको, लीज करारच (Lease Agreement) हवा. अशी मागणी दुकानदारांनी कायम ठेवल्यामुळे पणजी मार्केट दुकानदार संघटना (Panjim Market Shopkeepers Association) व महापालिका यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. परवा झालेल्या महापालिकेच्या बैठकीत १३ दुकानदार लीव्ह ॲण्ड लायसन्स करार करण्यास पुढे आले आहेत. इतरांना दिलेली मुदत संपल्यामुळे त्यांना बेदखल नोटीस पाठवल्याचे महापौर रोहित मोन्सेरात (Mayor Rohit Monsaratte) यांनी सांगितले होते. मात्र अद्याप आपणास नोटीस मिळालीच नाही. असा दावा दुकानदारांनी केला आहे.

Panjim Municipal Market (Goa)
Goa Crime: तरुणीची मरणानंतर होत असलेली बदनामी पोलिसांनी थांबवावी; आमदार रेजिनाल्ड

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मार्केट इमारत बांधतानाच दुकानदारांशी लीज करार केला जाईल असे सांगितले होते. राज्यातील इतर पालिका ५० ते ६० वर्षाचा लीज करार करतात. मात्र पणजी महापालिका लीज करार न करता लीव्ह व लायसन्स हा ११ महिन्याचा करारा करु इच्छीते. ज्याला आम्ही तयार नाही आहोत. मार्केटमधील वीजेची आमची बिले आम्ही भरतो. पे टॉयलेट वापरतो. जे भाडे रहित आहे ते देण्यास तयार आहोत.

शेवटचे एकदा पणजीच्या आमदाराना भेटून आम्ही आमची भूमिका त्यांना पटवून देऊ. न पेक्षा पुढील प्रक्रिया करण्यासाठी कायेदशीर सल्ला घेऊन पुढे जाऊ.

- धर्मेंद्र भगत (सचिव. पणजी मार्केट दुकानदार संघटना)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com