पावाच्या किंमतीवरून बेकर्स संघटनांमध्ये मतभेद

गोव्यात ऑक्टोबरपासून पावाची किंमत 5 रुपये करण्याचा निर्णय बेकर्स संघटनांनी घेतला होता
पावाच्या किंमतीवरून बेकर्स संघटनांमध्ये मतभेद
पावाच्या किंमतीमध्ये वाढDainik Gomantak

पणजी: राज्यात ऑक्टोबरपासून पावाची किंमत 5 रुपये करण्याचा निर्णय बेकर्स संघटनांनी घेतला असला तरी या संघटनांमध्ये मतभेद असल्याने काही भागात तो पूर्वीच्या दराने 4 रुपये तर काही भागात 5 रुपये नव्या दराने विकला जात आहे. या किंमतीतील फरकामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पावाच्या किंमतीसंदर्भात पुढील आठड्यात दक्षिण गोव्यात बैठक होण्याची शक्यता संघटनेचे पदाधिकारी आगपिटो यांनी व्यक्त केली. पावाची किंमतीत वाढ होण्यापूर्वी 50 ग्रॅम वजनाचा पाव (Pav) बेकरीतून 3.40 रुपयांना खरेदी करून तो 4 रुपये या दराने विकला जात होता.

वाढलेल्या महागाईमुळे राज्यातील बेकर्स संघटनांनी ही किंमत 5 रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात बेकर्स व कॉन्फेक्शनरी (Confectionery)अशा दोन वेगवेगळ्या संघटना असल्याने त्यांच्‍यातच मतभेद आहेत. हा निर्णय सर्व संघटनाना एकत्रित करून घेतल्याने त्याला आक्षेप आहे. येत्या 8 ऑक्टोबरला बेकर्स दिन आहे त्यानंतर या संघटनांची एकत्रित बैठक आयोजित करण्याबाबत विचार सुरू आहे अशी माहिती संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने दिली.

पावाच्या किंमतीमध्ये वाढ
Goa: पणजी भाजपातर्फे पणजी मार्केटमध्ये मास्क व सॅनिटायझरचे वाटप

किनारपट्टी भागात तसेच काही शहरी भागामध्ये 5 रुपये दराने पाव विक्री केला जात आहे. दक्षिणेत बेकर्स व कॉन्फक्शनरीमध्ये पाव 4 रुपये दराने विकला जात आहे. त्यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला आहे. पावाचे किमान वजन हे 50 ग्रॅम असणे सक्तीचे आहे मात्र काही बेकर्स या पावाचे वजन 45 ग्रॅम करून पाव 4 रुपये दराने विकत आहेत. त्यामुळे पावाचा आकार कमी झाला आहे. किनारपट्टी भागात हे पाव विकले जातात. हा व्यवसाय पारंपरिक असल्याने त्याला सरकारकडून मदत मिळावी यासाठी संघटनांतर्फे अनेकदा प्रयत्न करण्यात आले आहेत. या व्यवसायासाठी मजूर मिळणेही कठीण झाले आहे. या व्यवसायासाठी गोमंतकीय कामगार मिळत नाही त्यामुळे हा व्यवसाय सुरू ठेवणेही मुष्किलीचे बनत आहे असे मत एका बेकरी उत्पादकाने व्यक्त केले.

Related Stories

No stories found.