Goa Congress : सरकारचे नवीन जेटी धोरण सागरमालाचाच छुपा प्रकार

काँग्रेसचा आरोप : प्रत्येक पंचायतीने विरोध करण्याचें आवाहन
Goa Congress PC
Goa Congress PCDainik Gomantak

Goa Congress : गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने आणलेले नवीन जेटी धोरण हे दुसरे तिसरे काही नसून सागरमाला प्रकल्पाचाच छुपा प्रकार असल्याचा आरोप काँगेस पक्षाने केला असून या धोरणाला सर्व पंचायतीनी विरोध करावा असे आवाहन केले.

मडगाव येथे आज शुक्रवारी एल्विस गोम्स, सवियो डिसिल्वा व रामिरो मास्कारेन्हास यांनी एक पत्रकार परिषद घेतली. सरकारचे जेटी धोरण आणि नगर नियोजन धोरण हे गोव्याची संपत्ती दिल्लीच्या धनाड्याच्या घशात ओतण्याचे कारस्थान आहे असा आरोप गोम्स यांनी केला.

सागरमाला प्रकल्पा अंतर्गत गोवा राज्यातील जेटी विकसित करून त्या कोळशाच्या हाताळणीसाठी वापरण्याचे कारस्थान होते. मात्र त्यांना लोकांनी विरोध केल्यावर जुनी योजना गुंडाळून तीच नवीन स्वरूपात आणली आहे. आणि त्यासाठी फक्त 15 दिवसात यावर पर्यटन खात्याच्या वेबसाईटवर हरकती मागितल्या आहेत असे मास्कारेन्हस यांनी सांगितले. हे धोरण जर पर्यटनासाठी आहे तर खात्याने प्रत्येक गावात सुनावणी घेऊन लोकांना ते समजावून सांगावे असे आवाहन त्यांनी केले.

Goa Congress PC
Goa Crime News|...अखेर कुडचडे खुनासाठी वापरलेली बंदूक सापडली

नगर नियोजन धोरणात सरकार बदल करून शेत जमीनीत बांधकाम प्रकल्प उभे करू पाहत असून या धोरणावरही हरकती मांडण्यास फक्त 30 दिवसांची मुदत दिली आहे याकडे लक्ष वेधण्यात आले. हे धोरण गोवा विरोधी असून अशी धोरणे कुठल्याही विरोधाविना मंजूर करून घेता यावीत यासाठी काँग्रेसच्या आणखी आठ आमदारांना भाजपने फोडून नेले आहे, असा आरोप गोम्स यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com