Goa Congress : पक्षाला उभारी देण्यासाठी गोव्यात काँग्रेसने कंबर कसली, घेतला मोठा निर्णय

काँग्रेसने गोव्यातील 21 ब्लॉक्सच्या अध्यक्षांची नव्याने नियुक्ती केली आहे.
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

Goa Congress : आठ आमदारांच्या बंडानंतर गोव्यात काँग्रेस पक्ष अजूनही सावरलेला नाही. केवळ तीन आमदारांसोबत सध्या गोव्यात काँग्रेस पक्ष विरोधीपक्षाच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र आता जवळपास दोन महिन्यांनंतर गोव्यात काँग्रेसने पक्षबांधणीसाठी कंबर कसली आहे. काँग्रेसने गोव्यातील 21 ब्लॉक्सच्या अध्यक्षांची नव्याने नियुक्ती केली आहे.

Goa Congress
Sanjay Barde: ‘मोटोक्रॉस’साठी परवानगी कोणी दिली?

गोव्यात आठ आमदारांच्या बंडानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पक्षाला पुढे आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले आहेत. सोबतच काँग्रेस आमदार युरी आलेमाव, गिरीश चोडणकर आदी नेत्यांनी राज्यातील सरकारच्या धोरणांवर टीका करत विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचं काम केलं आहे. मात्र आता जसजशी लोकसभेची निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तसा प्रत्येक पक्षाने आगामी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेमधून पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न चालवला आहे, तिथेच आज गोवा काँग्रेसने स्थानिक पातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी ब्लॉक अध्यक्षांची नेमणूक केली आहे. गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी नवीन ब्लॉक अध्यक्षांची यादी जाहीर केली आहे

Goa Congress
‘गोमन्तक’च्या शिरपेचात मानाचा तुरा; प्रतिष्ठेचे दोन पुरस्कार जाहीर

कोण असतील गोव्यात काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष

 1. मांद्रे - नारायण रेडकर

 2. डिचोली - मनोज नाईक

 3. म्हापसा - शशांक नार्वेकर

 4. शिवोली - पार्वती नागवेकर

 5. साळगाव - अतुल नाईक

 6. हळदोणा - अॅश्विन डिसोझा

 7. ताळगाव - ज्ञानेश्वर गोवेकर

 8. सांत आंद्रे -मनोज पालकर

 9. साखळी - मंगलदास नाईक

 10. प्रियोळ - हर्षद भोसले

 11. फोंडा - विल्यम आग्युएर

 12. मडकई - ज्ञानेश्वर बोरकर

 13. दाबोळी - वसंत नाईक

 14. कुठ्ठाळी - पीटर डिसोझा

 15. कुडतरी - मिलाग्रीस फर्नांडिस

 16. फातोर्डा - अन्वर सय्यद

 17. कुंकळ्ळी - अझीझ नरोन्हा

 18. वेळ्ळी - फ्रान्सिस्को रॉड्रिग्ज

 19. केपे - अवधूत आमोणकर

 20. कुडचडे - पराग सबनीस

 21. सावर्डे - जयेश पाटील

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com