काँग्रेसच्या काळात बाबू आजगावकर हेच ड्रग्स व्यापारात सहभागी?; तोडणकरांचा आरोप

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

ड्रग्सच्या अवैध व्यवहाराप्रकरणी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. याप्रकरणी काँग्रेसने राज्य सरकारला गोव्यातील ड्रग्सच्या व्यापाराची पाळेमुळे शोधून काढण्याचे आव्हान दिले आहे.

पणजी: पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी काँग्रेसच्या काळात ड्रग्सचा व्यापार चालू असल्याचा आरोप केला होता. यावर उत्तर देताना काँग्रेसने कदाचित आजगावकर हेच त्यावेळी असे व्यवहार करत असतील अशी टीका केली आहे. त्यांनी राज्य सरकारला याबाबतीत आव्हान देत चौकशीचीही यावेळी मागणी केली.

दरम्यान, ड्रग्सच्या अवैध व्यवहाराप्रकरणी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. याप्रकरणी काँग्रेसने राज्य सरकारला गोव्यातील ड्रग्सच्या व्यापाराची पाळेमुळे शोधून काढण्याचे आव्हान दिले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा तसेच राज्यातील तपास यंत्रणाही भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे आरोप करण्याऐवजी खरेच काँग्रेसच्या काळात असे घडले असेल तर त्यांनी याप्रकरणी चौकशी करावी. चौकशीत काँग्रेस पक्षावर आरोप करणारे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर हेच त्यावेळी ड्रग्सचा व्यापार करत असल्याचे सिद्ध होईल, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरिश चोडणकर यांनी केला आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या