गोवा काँग्रेसमधील नाराजी नाट्य संपेना; खलबते सुरु

दिगंबर कामत काँग्रेसच्या दोन आमदारांसह पणजीच्या दिशेने
Digambar Kamat |Goa BJP vs Congress
Digambar Kamat |Goa BJP vs CongressDainik Gomantak

गेल्या महिनाभरात गोवा काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरु आहे. प्रदेशाध्यक्ष पदाची खांदेपालट झाल्यानंतर काँग्रेस नेते दिगंबर कामत नाराज असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. या पार्श्वभूमीवर दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशा आशयाची चर्चा राजकिय वर्तूळात सुरु आहे. याला काँग्रेस नेत्यांनी अफवा असल्याचे म्हणत, सरळ सरळ खंडन केले. तरी ही पुन्हा काँग्रेस नेते दिगंबर कामत हे दोन आमदारांना सोबत घेत पणजीच्या दिशेने निघाल्याची माहिती समोर आली आहे.

Digambar Kamat |Goa BJP vs Congress
आम्ही भाजपमध्ये जाणार नाही - आमदार राजेश फळदेसाई

मिळालेल्या माहितीनुसार दिगंबर कामत सध्या 7 काँग्रेस नेत्यांसह भाजपच्या संपर्कात आहेत. तसेच सध्या गोव्यात काँग्रेसचे 7 आमदार संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. गोवा विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असले तरी काँग्रेसचे सेनापती गैरहजर राहिले असल्याने हे संपर्कात नसलेले काँग्रेस नेते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Digambar Kamat |Goa BJP vs Congress
या सर्व अफवा आहेत..; मायकल लोबो

...तर काँग्रेसकडून विरोधी पक्षाचा दर्जा जाणार

गोव्यातील काँग्रेसच्या 7 आमदारांनी पक्ष सोडल्यास काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही गमवावे लागणार आहे. गोव्याच्या 40 जागांच्या विधानसभेत सध्या सत्ताधारी एनडीएचे 25 आमदार आहेत, तर काँग्रेसचे 11 आमदार आहेत. काँग्रेसच्या 7 आमदारांनी पक्ष सोडल्याची चर्चा खरी ठरली तर विरोधी पक्षनेतेपदही त्यांच्या हातातून जाणार आहे.

... म्हणून मी बैठकांना हजर राहीलो नाही - दिगंबर कामत

2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार दिगंबर कामत यांनी शनिवारी झालेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीला हजेरी लावली नाही. आपल्याला विरोधी पक्षनेते का करण्यात आले नाही याबद्दल ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

कामत यांनी सांगितले कि, मी माझी बाजू वरिष्ट नेत्यांना सांगितली आहे. तसेच आपल्याला सध्याच्या काँग्रेस बैठकीसाठीची कोणती ही माहिती दिली नसल्याने मी या बैठकीस उपस्थित राहीलो नाही असे ही ते म्हणाले.

भाजप आमच्या आमदारांना बळकावण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न

गोव्यातील काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी काँग्रेसचे काही नेते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या प्रकरणावर बोलताना या सर्व अफवा असल्याचे सांगितले. तसं काही नाही. विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे आणि कोणी ना कोणी अफवा पसरवणार आहे.

मला सांगितले गेले नाही, जर मला सांगितले तर मी तुम्हाला आधी सांगेन. तसेच काँग्रेसचे सर्व आमदार शाबूत आहेत पण भाजप आमच्या आमदारांना बळकावण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com