Curchorem News: काँग्रेस कार्यकर्त्यांचे आरोग्य अधिकाऱ्यांशी वर्तन निषेधार्ह

विश्‍वास देसाई : काकोडा आरोग्य केंद्राचे 18 ऑक्टोबरला उद्‌घाटन
Curchorem News
Curchorem NewsDainik Gomantak

Curchorem News आरोग्य अधिकारी डॉ. मेधा कुडचडकर यांना दि.31 रोजी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्या प्रमाणे घेराव घालून असभ्य वर्तन केले, त्याचा आम्ही निषेध करत असल्याचे कुडचडे भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास सावंत देसाई यांनी कुडचडे येथे कुडचडे भाजपा मंडळ व रोगी कल्याण समितीतर्फे संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. कुडचडे काकोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे 18 ऑक्टोबर रोजी उदघाटन होणार आहे,असेही त्यांनी सांगितले.

यावेळी रोगी कल्याण समितीचे डॉ. भिसो शेटगावकर,राजेंद्र वस्त,मुकूंद नाईक व इतर उपस्थित होते. कुडचडे येथील आरोग्य केंद्राची जुनी इमारत पाडून तिथे सरकारने भव्य अशी नवीन इमारत उभारली आहे व तिचे अध्याप उदघाटन केले नसल्याने काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला होता.

सदर आरोग्य केंद्राची इमारत पूर्ण झाली असली तरी याठिकाणी लोकांना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आमदार तथा मंत्री नीलेश काब्राल हे प्रयत्नशील असून सुविधा मिळत नाहीत, तोपर्यंत या आरोग्य केंद्राचे उदघाटन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते,असे सावंत देसाई यांनी सांगितले.

सध्या युद्धपातळीवर इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असून 18 ऑक्टोबर रोजी या आरोग्य केंद्राचे उदघाटन करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

Curchorem News
Anjuna Beach: हणजूण किनारी सीआरझेडच्या अधिकाऱ्यांना रोखले, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा दावा

सध्या काकोडा आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना तिथे उपचार होत नसतील तर पुढील व अधिक उपचारांसाठी जिल्हा इस्पितळात रूग्णांना पाठवून देण्यात येत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपांत कुठलेही तथ्य नसून आरोग्य अधिकाऱ्यांना घेराव घालून काँग्रेसने याविषयी प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला होता.

-विश्वास सावंत देसाई, कुडचडे भाजप मंडळ अध्यक्ष

Curchorem News
Mapusa Municipality: म्हापशात राखीव जागेत अतिक्रमण; ‘केटीसी’ जवळील झोपड्या जैसे थे!

काँग्रेस कार्यकर्त्यांनी 31 रोजी आपल्याला घेराव घातला, ते आपल्याला आवडले नाही. अचानक साधारण तीस लोकांनी आपल्या कक्षात येऊन आपल्यावर प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी आपल्याला माहीत आसलेली सर्व माहिती आपण त्यांना देण्याचा प्रयत्न केला.

-डॉ. मेधा कुडचडकर,आरोग्य अधिकारी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com