Goa Politics : विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग बिकट; सभापतींची भूमिका ठरणार निर्णायक

काँग्रेसने विधिमंडळ गटनेतेपदी युरी आलेमाव यांची निवड केली असली तरी काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेतेपद येणे कठीण झाले आहे.
Ramesh Tawadkar
Ramesh Tawadkar Dainik Gomantak

Goa Politics : काँग्रेसने विधिमंडळ गटनेतेपदी युरी आलेमाव यांची निवड केली असली तरी काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेतेपद येणे कठीण झाले आहे. कारण नियमानुसार विधानसभेतील दहा टक्के सदस्य विरोधी गटाकडे असावेत, असा निकष आहे. त्यामुळे गटनेता निवडूनसुद्धा काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद येणे अवघड तर आहेच, शिवाय ते इतर कोणत्याही पक्षाकडे जाणार नाही, ही वस्तुस्थिती आहेे.

याविषयी सभापती रमेश तवडकर म्हणाले, विधानसभा कामकाज नियमानुसार विरोधी गटाकडे किमान 10 टक्के सदस्य असतील, तरच त्यांना विरोधी पक्षनेतेपद देता येते. त्या नियमानुसार गोवा विधानसभेची सदस्य संख्या 40 आहे. त्यानुसार कॉंग्रेसकडे किमान 5 आमदार असणे आवश्यक आहे. मात्र, त्यांच्याकडे केवळ तीनच आमदार आहेत. त्यामुळे त्यांना ते पद मिळणे अवघड आहे. या पदासाठी पक्षाकडून तसा अर्ज व शिफारस यावी लागते. अद्यापही काँग्रेसकडून तशी शिफारस आलेली नाही. ती शिफारस आल्यास सरकारच्या कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून मी अंतिम निर्णय घेईन. विधानसभेमध्ये सभापतींचा निर्णय अंतिम मानला जातो. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाबाबत सभापती तवडकर जो निर्णय घेतील, तोच अंतिम असणार आहे.

Ramesh Tawadkar
Goa Forward Party : गोवा फॉरवर्डचा ‘नारळ’ लवकरच कॉंग्रेसच्या हातात

पेच कायम

1 संसदीय नियमानुसार विरोधी पक्ष नेतेपदासाठी विरोधी पक्षाकडे किमान 10 टक्के सदस्य संख्या असावी लागते.

2 लोकसभेतही याच कारणास्तव विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी कोणालाही दिलेली नाही. राज्यातही काँग्रेस आमदारांच्या पक्षांतरानंतर हा पेच निर्माण झाला आहे.

3 मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय सभापतीच घेतील. दुसरीकडे काँग्रेसने गोवा फॉरवर्डला पक्षात विलिनीकरणाची विनंती केली आहे. तसे झाल्यास काँग्रेसची सदस्य संख्या 4 होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com