Mahadayi Water Dispute : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत खोटारडे; म्हादईप्रश्नी अमित पाटकरांचा पलटवार

प्रधानमंत्री गोमंतकीय शिष्टमंडळास भेटण्यासाठी तयार नाहीत का? असा सवाल गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.
Amit Patkar
Amit Patkar Dainik Gomantak

Mahadayi Water Dispute: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे खोटे बोलत आहेत. मुख्यमंत्र्यांनी म्हादईवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक कधी बोलावली ते सिद्ध करण्याचे धाडस दाखवावे, असं थेट आव्हान गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिलं आहे.

विरोधीपक्षाच्या आमदारांनी म्हादईवरील सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला. यावरुन म्हादईप्रश्नी विरोधकांना रस नाहीये असे त्यांनी गेल्या वेळी दाखवून दिले आहे. त्यामुळेच अमित शहांना भेटण्यासाठी दिल्लीला जाणाऱ्या शिष्टमंडळाचा भाग होण्यासाठी विरोधकांना बोलावण्यात आले नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतंच केलं होतं.

दरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 30 डिसेंबर 2022 रोजी कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला दिलेली मान्यता मागे घेण्याची मागणी करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार असल्याची घोषणा केली होती. त्या पत्राचे काय झाले? गृहमंत्री अमित शहा यांची भेट का? प्रधानमंत्री गोमंतकीय शिष्टमंडळास भेटण्यासाठी तयार नाहीत का? असा सवाल गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.

Amit Patkar
Sweet Lake : हरमलमधील स्वीट लेक नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर

म्हादई वाचविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांसमवेत केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. आज, बुधवारी सायंकाळी सात वाजता ही बैठक होणार आहे. शाह यांना जे शिष्टमंडळ भेटणार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विधानसभेचे सभापती रमेश तवडकर, जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री व पर्यावरण मंत्री निलेश काब्राल, वनमंत्री विश्वजीत राणे, वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांचा समावेश असणार आहे.

Amit Patkar
Mahadayi Water Dispute: ...म्हणून अमित शहांच्या भेटीला विरोधकांना बोलावले नाही

केंद्रीय जल आयोगाने म्हाईद नदीवरील प्रकल्पाबाबत कर्नाटकच्या नव्या डीपीआरला मंजुरी दिल्यापासून गोव्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. सर्व स्तरातून या गोष्टीचा निषेध केला जात असून आता गोव्यात म्हादईसाठी जनआंदोलनही उभारले गेले आहे. त्यामुळे म्हादई वाचविण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ सायंकाळी शाह यांना भेटणार

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हे मंत्रीमंडळातील पंतप्रधान मोदी यांच्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. त्यामुळेच गोव्याची अस्मिता असलेल्या म्हादई नदीचा प्रश्न राज्यातील नेत्यांनी शाह यांच्या कानावर घातल्यावर शाह काय भूमिका घेतात, याकडे गोव्यासह कर्नाटकचे लक्ष लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com