Amit Patkar : स्वच्छता घोटाळ्याचा आरोप ‘क्लिनअप ड्राईव्ह’मुळे खरा

अमित पाटकर यांचा आरोप; 60 कोटी वाचवण्याची मागणी
Amit Patkar News | Goa Congress News
Amit Patkar News | Goa Congress NewsDainik Gomantak

Amit Patkar : भाजप सरकारने शनिवारी 37 किनाऱ्यांची स्वच्छता मोहीम ‘क्लिनअप ड्राईव्ह''द्वारे राबविली. परंतु काँग्रेसने यापूर्वी किनारे स्वच्छतेसाठी दिलेल्या कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. तो आरोप आता या मोहिमेमुळे खरा ठरला आहे, असा आरोप करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.

दिगंबर कामत आणि आलेक्स सिक्वेरा यांनी समुद्र किनारे स्वच्छतेचे कंत्राट रद्द करण्यास सांगावे व राज्याचे 60 कोटी रुपये वाचवावे, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यासह इतरांनी गोव्यात ‘क्लीन कोस्ट, सेफ सी‘ मोहिमेसाठी विविध किनाऱ्यांवरून मोठ्या प्रमाणात कचरा गोळा केल्याचे धक्कादायक दृष्य जनतेने पाहिले आहे. यावरून सरकारने नियुक्त केलेले समुद्रकिनारा सफाई कंत्राटदार काहीही करत नसल्याचे सिद्ध होते.

गोवा लोकायुक्तांनी राम क्लीनर्स अँड डेव्हलपर्स आणि भूमिका क्लिनटेक सर्व्हिसेस या दोन कंत्राटदारांकडून झालेल्या किनारे सफाई घोटाळ्याची चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर दृष्टी लाईफसेव्हिंगला दिलेल्या कंत्राटातही असाच घोटाळा झाल्याचे आढळून आले होते.

Amit Patkar News | Goa Congress News
Digambar Kamat : दिगंबर कामतांचा उपमुख्यमंत्रिपदावर दावा!

दर आठवड्याला मोहीम राबवा

किनारा स्वच्छता मोहीम दर आठवड्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राबवावी. त्यात स्थानिक पंचायतींना सहभागी करून घ्यावे, ते काम प्रभावीपणे करतील आणि राज्यातील किनारे स्वच्छ राहतील. भाजप सरकारने आपले ‘मिशन 30 टक्के कमिशन’ पूर्ण करण्यासाठी मुंबईतील दोन कंत्राटदारांची नियुक्ती करण्यापूर्वी गोव्याचे कंत्राटदार वर्षाला केवळ ३ कोटी रुपये घेऊन किनारे स्वच्छ करण्याचे काम करत होते, याची आठवण त्यांनी ठेवावी, असेही पाटकर यांनी नमूद केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com