घोटाळा कुठे झाला ते दाखवाच; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे खुले आव्हान

गोमंतक ऑनलाईन टीम
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

३५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असेल तर संबंधित लोकलेखा समितीचा अहवाल प्रसिद्ध करा, असे आव्हान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज येथे दिले.

पणजी- ३५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असेल तर संबंधित लोकलेखा समितीचा अहवाल प्रसिद्ध करा, असे आव्हान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज येथे दिले. भाजपने केलेल्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले. 

 भाजपने २००९-१० मध्ये संबंधित घोटाळा झाल्याचा आरोप करून चांगलेच रान पेटवले होते. त्यामुळे गोव्यात २०१२ मध्ये कॉंग्रेसचे सरकार गेले होते. आता भाजप सरकारने ३५ हजार कोटी रुपयांचा खाण घोटाळा झालाच नाही, असे सांगणे सुरु केल्याने कॉंग्रेसने ती संधी घेत लोकलेखा समितीचा अहवाल प्रसिद्ध करा, अशी मागणी आज केली.

संबंधित बातम्या