'भाजप देशात सावकारांची राजवट आणण्यात व्यस्त'

goa congress president attacked on bjp during the kisan sammelan
goa congress president attacked on bjp during the kisan sammelan

मडगाव- श्रीमंतांचा जयजयकार करण्याचे धोरण अवलंबत भाजप देशात सावकारांची राजवट आणण्यात व्यस्त आहे. त्यामुळेच सरकारला गरीबांचे, शेतकऱ्यांचे दु:ख समजत नाही. भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना राजभवनावरील काँग्रेसच्या  मोर्चात सामील झालेले शेकडो कष्टकरी शेतकरी दिसले नाहीत, अशी टीका गोव्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी रीवण येथे किसान काँग्रेसतर्फे घेण्यात आलेल्या किसान मेळाव्यात बोलताना केली. या मेळाव्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शेतकऱ्यांविषयी खरेच भाजपला दु:ख झाले असते तर गोव्यातील ऊस, काजू, सुपारी, नारळ तसेच भातशेती करणाऱ्या गोमंतकीय शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या ऐकून घेण्यासाठी मागील आठवड्यात  भाजपची जाहिरतबाजी करण्यासाठी आलेले केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर शेतकऱ्यांना भेटले असते, असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी यावेळी म्हटले. भाजपने आणलेल्या नव्या कायद्याने विविध पिकांसाठी मिळणारी सरकारी आधारभूत किंमत यापुढे बंद करुन शेतकऱ्यांना मोठ्या उद्योगपती व व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याचे कारस्थान भाजप सरकारने आखल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

भाजपला देशातला गरीब, शेतकरी दिसत नसून फक्त भांडवलदारांचे हित दिसते. या असंवेदनशील भाजपच्या कानावर सामान्यांच्या समस्या पडत नाहीत, असा टोला खासदार फ्रांसिस सार्दीन यांनी यावेळी बोलताना लगावला. नवीन कृषी कायदा आणल्याने दलाली बंद होणार, असे सांगणाऱ्या केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांना या कायद्यामुळे राज्य सरकारला ९ कोटींचे नुकसान होणार असे स्पष्ट सांगणारे भाजपचेच ज्येष्ठ नेते प्रकाश वेळीप हे दलाल वाटतात का हे त्यांनी  स्पष्ट करावे, अशी सवाल काँग्रेस किसान मोर्चाचे निमंत्रक अभिजीत देसाई यांनी केला. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com