67 टक्के जनता भाजपविरोधात असल्याचे निकालातून उघड; गिरीश चोडणकर

पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्यास नव्या टीमने प्राधान्य द्यावे; मायकल लोबो
Goa Congress President Girish Chodankar hands over his charge to Amit Patkar in presence of AICC Goa Observer
Goa Congress President Girish Chodankar hands over his charge to Amit Patkar in presence of AICC Goa ObserverDainik Gomantak

केवळ मतविभागणीमुळेच काँग्रेसचा पराभव झाला आहे. 67 टक्के जनता भाजपविरोधात असल्याचे निकालातून उघड झाले आहे. नव्या टीमला पूर्ण सहकार्य करून काँग्रेसला पुन्हा बळकटी देऊया अस मत माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी यावेळी मिरामार येथे बोलताना व्यक्त केले आहे.

तसेच निवडणुकांत उमेदवार ठरवण्याचा अधिकार प्रदेश काँग्रेसला हवा. 2 वर्षे आधी उमेदवार निश्चित करून काम सुरू केल्यास निवडणुकांत काँग्रेसचा निश्चित विजय होईल. पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्यास नव्या टीमने प्राधान्य द्यावे अस मत विरोधी पक्षनेते मायकल लोबो (Michael-Lobo) यांनी व्यक्त केले आहे.

Goa Congress President Girish Chodankar hands over his charge to Amit Patkar in presence of AICC Goa Observer
कठीण परिस्थितीत काँग्रेसने आमदारांची संख्या 1 वरून 11 केली; अमित पाटकर

मायकल लोबो म्हणाले की, गोव्यातील लोकांना बदल हवाहोता कारण त्यांना त्यांचे ऐकणारे सरकार हवे होते. पण मतांच्या विभाजनामुळे हे होऊ शकले नाही. निकालानंतर लोकांना त्यांचा ‘निर्णय’ कळला." असे लोबो  म्हणाले. काँग्रेस सोडून ‘नवी पहाट’मध्ये सामील झालेल्यांना पुन्हा पक्षात आणून काँग्रेसला मजबूत बनवावे लागेल, असे लोबो म्हणाले.आम्ही आमचे गट मजबूत बनवण्यावर आणि आमच्या कृती पुनरुज्जीवित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. भविष्यात आम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागेल आणि पंचायत आणि लोकसभा निवडणुकीत आम्हाला स्वतःला सिद्ध करावे लागेल." असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, गोव्यात अनेक प्रश्न आहेत, ते विधानसभेत आणि सर्व व्यासपीठांवर मांडण्याची गरज आहे. “आपण चाळीसही गटांचे पुनरुज्जीवन करूया. चला एक नवीन सुरुवात करूया.” असे लोबो म्हणाले. “लोकांना आता कळले आहे की, वेगळ्या दिशेने मतदान केले तर भाजपची सत्ता येते. असे पुन्हा होऊ नये.” असे ते म्हणाले.

दरम्यान, देशात पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकींचा निकाल लागला असून भाजपने चार राज्यात तर आप ने पंजाबमध्ये सत्ता काबीज केली आहे. मात्र देशातील सर्वात जुन्या पक्षाला सत्ता खेचून आणता आलेली नाही. यावरून काँग्रेस या पाचही राज्यात संघटनात्मक बदल करण्याचे ठरवले होते. त्याप्रकारे इतर राज्यात तसे बदल केले जात आहेत. तसाच बदल गोव्यात ही झाला असून गोवा काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. काँग्रेसने गोवा प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीच्या अध्यक्षपदी अमित पाटकर आणि कार्लोस फरेरा यांची यांची 'मुख्य व्हिप' म्हणून नियुक्ती झाली आहे. दरम्यान गोवा काँग्रेसमध्ये करण्यात आलेले हे बदल गोव्याच्या राजकारणात (Politics) आणि गोवा (Goa) काँग्रेसमध्ये कोणते परिणाम करतात हे पाहावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com