गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांना पितृशोक

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे वडील राया चोडणकर यांचे आज बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात निधन झाले. 

बांबोळी : गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे वडील राया चोडणकर यांचे आज बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात निधन झाले. गेले आठवडाभर त्यांच्यावर कोरोनावरील उपचार सुरू होते. चोडणकर कुटुंबीयांत गिरीश चोडणकर वगळता इतर सर्वाना कोरोनाची लागण झाली होती.

गोवा नगरपालिका निवडणुक : प्रभागांच्या आरक्षणावरून भाजपमध्येच धुसफूस

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे वडील गेले आठवडाभर गोमेकॉ इस्पितळात उपचार घेत होते. आज सकाळी राया चोडणकर यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी मडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याने, आरोग्य संचालनालयाकडून जारी केलेल्या नियमांनुसारच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

गोव्यात वर्षभरानंतर भरणार ग्रामसभा

संबंधित बातम्या