Goa: कॉंग्रेस अध्यक्षांची पर्तगाळ मठाला भेट व स्वामीजींचे दर्शन

विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या चातुर्मास व्रत स्विकार सोहळ्याला उपस्थिती (Goa)
Goa: कॉंग्रेस अध्यक्षांची पर्तगाळ मठाला भेट व स्वामीजींचे दर्शन
Congress President Girish Chodankar received blessings from Vidhyadhishteerth Swamiji, Parthgalee, Cancona - Goa. On Saturday, 31 July, 2021.Sushant Counclikar / Dainik Gomantak

मडगाव: गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष (GPCC President) गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी आज श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ मठाला भेट (Visit to Shri Sansthan Gokarn Parthgalee math) देवून श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या (Shreemad Vidhyadhishteerth Swami Maharaj) चातुर्मास व्रत (Chaturmas Vrat) स्विकार सोहळ्याला उपस्थिती लावली व त्यांचे आशिर्वाद घेतले (Received Blessings). कॉंग्रेसचे यूवा नेते युरी आलेमांव, सरचिटणीस जनार्दन भंडारी, दया पागी तसेच काणकोण गट अध्यक्ष प्रलय भगत त्यांच्यासोबत हजर होते. श्री रामदेव वीरविठ्ठल तसेच श्रीमद् विद्याधीराजतीर्थ स्वामीजींच्या समाधींचे दर्शन घेवून त्या सर्वांनी श्री विद्याधीश स्वामीजींकडुन फल मंत्राक्षता घेतल्या. (Goa)

Congress President Girish Chodankar received blessings from Vidhyadhishteerth Swamiji, Parthgalee, Cancona - Goa. On Saturday, 31 July, 2021.
गुरुंचे गुणगान केल्‍यास मनाची शुद्धी

श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामीजींनी सर्वांना आशिर्वाद देत, समाजासाठी निस्वार्थीपणे काम करण्याचा सल्ला दिला व लोकसेवेचे फळ नेहमी चांगलेच मिळते असे सांगीतले. पांचशे वर्षांचा इतिहास असलेल्या मठास भेट देवून स्वामीजींचे आशिर्वाद घेणे माझे भाग्य आहे, असे गिरीश चोडणकर म्हणाले. माझ्या आयुष्यातला हा अविस्मरणीय दिवस असल्याचे यूवा नेते युरी आलेमांव म्हणाले. मठ समितीचे उपाध्यक्ष आर आर कामत व सचिव अनील पै यांनी सर्वांचे स्वागत केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com