Goa Congress: कळंगुट काँग्रेस सेवा दलाच्या प्रमुखपदी राजेंद्र कोरगांवकर

छोटेखानी कार्यक्रमात कोरगांवकर यांना नियुक्ती पत्र बहाल (Goa Congress)
Goa Congress: कळंगुट काँग्रेस सेवा दलाच्या प्रमुखपदी राजेंद्र कोरगांवकर
Goa Pradesh Congress (Goa Congress)Dainik Gomantak

Goa Congress: कळंगुट कॉग्रेस (Calangute Congress) गट समितीचे माजी अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कोरगांवकर यांची कळंगुट (Rajendra Korgaonkar, Chief of the Congress Service Force) कॉग्रेस सेवा दलाच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रीय कॉग्रेस सेवा दलाचे प्रमुख शंकर किर्लापारकर (Shankar Kirlparkar, Chief of the National Congress Service Force) यांच्या उपस्थितीत झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात कोरगांवकर यांना यासंबंधात नियुक्ती पत्र बहाल करण्यात आले.

Goa Pradesh Congress (Goa Congress)
हजारो कोटींचे प्रकल्प पूर्ण होत असतानाही माझ्यावर अन्याय का होतो: कार्लुस आल्मेदा

दरम्यान, इतरांची सेवा करणे, कॉग्रेस जनांचे ब्रीद असल्याचे सांगतानाच  कळंगुट - बागा परिसरातील टिटो लेनच्या आवारात एकुण सहा  कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने स्थानिक आरोग्य केद्राच्या अधिकार्यांनी याभागात विशेष लक्ष ठेवण्याची कोरगांवकर यांनी मागणी केली. तथापि,  पर्यटनाच्या नावाखाली किनारी भागात कोवीड नियमांचे उल्लंघन करीत मोठ्या प्रमाणात जमा होत गोंधळ घालणार्या गोंधळी  पर्यटकांवर कळंगुट पोलिस कक्षाकडुन कारवाई करण्याची जोरदार मागणी राजेंद्र कोरगांवकर यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com