Goa Elections: काँग्रेसने युतीसंदर्भात निर्णय घ्यावा, विजय सरदेसाईंचे वक्तव्य

स्थिती हाताबाहेर गेल्यानंतर निर्णय घेऊन काही फायदा होणार नाही अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे (Goa Forward Party) अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी व्यक्त केली
Vijai Sardesai, member of the Goa Legislative Assembly representing the Fatorda constituency
Vijai Sardesai, member of the Goa Legislative Assembly representing the Fatorda constituencyDainik Gomantak

मडगाव: गोव्यात (Goa) भाजपला (BJP) यशस्वी टक्कर देण्यासाठी सर्व समविचारी पक्षांची युती व्हावी अशी गोव्यातील जनमानसाची इच्छा आहे. ही युती करण्या संदर्भात काँग्रेसने (Congress) लवकरच निर्णय घेण्याची गरज आहे. स्थिती हाताबाहेर गेल्यानंतर निर्णय घेऊन काही फायदा होणार नाही अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे (Goa Forward Party) अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी व्यक्त केली.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि गोवा फॉरवर्ड या तीन पक्षांनी एकत्र येऊन युती करण्याची गरज काल राष्ट्रवादीचे गोवा प्रदेश अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आज सरदेसाई यांनीही ही गरज व्यक्त केली आहे. ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत त्यासाठी काँग्रेसला आम्ही निर्णय कळविण्यासाठी वेळ दिला आहे. काँग्रेसने त्या अवधीत हा निर्णय घ्यावा असे ते म्हणाले.

दरम्यान, कलाकार राजदीप नाईक यांच्या गाडीची काच फोडण्याचा जो प्रकार झाला आहे तो सरकार पुरस्कृत दाहशतवादाचा एक भाग असे म्हणत जर सरकारला हा प्रयत्न पचला तर भविष्यात सरकार विरोधात आवाज उठविणाऱ्या प्रत्येकाचा आवाज हे सरकार असाच दाबून टाकण्याचा प्रयत्न करेल असे ते म्हणाले.

Vijai Sardesai, member of the Goa Legislative Assembly representing the Fatorda constituency
Goa Elections: BJP चे अनेक आमदार NCP च्या संपर्कात

या सरकारने शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केले असून मागच्या वर्षी आलेल्या वादळात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांनाही अजून नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com