
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 च्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाची सोशल मीडिया टीम सज्ज झाली असून पक्षाची धोरणे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे. पक्षाच्या सोशल मीडिया टीमची आज गोवा कॉंग्रेसचे मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर व सोशल मीडियाचे अध्यक्ष दिव्यकुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीला उत्तर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, महिला अध्यक्षा बीना नाईक, युवक कॉंग्रेस अध्यक्ष जोएल आंद्राद, सेवादल अध्यक्ष जयदेव प्रभुगावकर, रोहन नाईक, अजमल सय्यद, ग्लॅन लॅसेंड्रा, आरमांडो फॅरेरा, सोहन शणैय, शमिला सिद्दीकी, बिविध गटांचे अध्यक्ष व त्यांचे समन्वयक उपस्थित होते.
यावेळी पणजीकर म्हणाले की, सोशल मीडियाचा वापर राज्य आणि देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी करता येतो. आता बहुतेक लोक सोशल मीडिया वापरत असून लोकांशी कनेक्ट होण्याचे एक चांगले माध्यम बनले आहे. म्हणूनच, राष्ट्र उभारणीच्या आमच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण त्याचा प्रभावीपणे वापर करणे आवश्यक आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्याचा आधार घेणे आवश्यक आहे."
“भाजपने जनतेचा आवाज दाबून आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना पक्षांतर करण्यास प्रवृत्त करून आपल्या लोकशाहीची हत्या केली आहे. असे प्रकार थांबले पाहिजे. अशा नेत्यांना निवडणुकीत पराभूत करून त्यांना घराची वाट दाखवण्याचा धडा फक्त जनताच शिकवू शकते. भाजप देशाचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
"कार्यशाळेचा उद्देश आमच्या पक्षाला डिजिटल कौशल्याने सक्षम करणे. आमच्या संदेशाला प्रभावीपणे संलग्न करणे, जोडणे आणि विस्तारित करणे हा आहे," असे दिव्याकुमार म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.