"गोव्यातील अपात्रता उमेदवारांच्या प्रकरणाचा निर्णय सभापतींना आज घ्यावाच लागेल"

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

काँग्रेस मधून भाजप मध्ये गेलेल्या 10 आमदारांविरोधात अपात्रता याचिका सुनावणीसाठी याचिकादार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आता विधानसभा संकुलात दाखल झाले आहेत.

पणजी: काँग्रेस मधून भाजप मध्ये गेलेल्या 10 आमदारांविरोधात अपात्रता याचिका सुनावणीसाठी याचिकादार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आता विधानसभा संकुलात दाखल झाले आहेत.

त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सभापतींना आज याचिका निकालात काढावी लागेल मग तो निर्णय माझ्या बाजूचा असेल वा विरोधातील असे वक्तव्य केले आहे. चोडणकर यांनी आमदार नीळकंठ हळर्णकर, आतानासिओ मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, फ्रान्सिस सिल्वेरा, आंतोनिओ फर्नांडिस, विल्फ्रेड डिसा, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, इजिदोर फर्नांडिस, चंद्रकांत कवळेकर यांच्याविरोधात अपात्रता याचिका सादर केली आहे. सभापती या याचिकेवर सुनावणी घेत नाहीत म्हणून चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तेथे ती याचिका प्रलंबित असून मागील सुनावणीवेळी सॉलिसिटर जनरल यांनी ही याचिका सुनावणीसाठी ठेवण्यात आली असल्याकडे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधले होते. प्रतिवादी आमदार अद्याप सुनावणीसाठी यायचे आहेत.

गोव्यातली पहिलीच दुर्मिळ घटना; यकृतात वाढला अडीच महिन्यांचा गर्भ 

त्याचबरोबर ढवळीकर यांनी आज सांगितले की, "निर्णय काय होईल यावर मी भाष्य करू इच्छित नाही आता जो काय निर्णय घ्यायचा आहे तो सभापतींनी घ्यायचा आहे. आज निर्णय होईल असेही मी म्हणत नाही. आधी सभापती काय निर्णय घेतात ते पाहू आणि नंतर या विषयावर बोलू" असे त्यांनी नमूद केले आहे.

गोव्यातील कुडचडे रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेचे डबे अचानक घसरले 

संबंधित बातम्या