Goa:नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

महिला काँग्रेस : गोव्यात महिलांना सुरक्षा पुरविण्यात सरकार अपयशी
Goa Congrss Agitation
Goa Congrss AgitationDainik Gomantak

पणजी : गोव्यात (Goa) महिलांच्या (Womens Congress) सुरक्षेबाबत अत्यंत दयनीय स्थिती असून महिन्याभराच्या कालावधीत बलात्कार, विनयभंग, खून, अपहरण अशी पाच गंभीर प्रकरणे घडली आहेत. या परिस्थितीची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr Pramod Sawant) यांच्यासह अन्य मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा बीना नाईक (Bina Naik) यांनी शुक्रवारी केली. गोव्यातील वाढत्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ महिला काँग्रेसने शुक्रवारी पणजीतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन आयोजित केले होते. त्यावेळी नाईक यांनी सरकारवर टीका केली. राज्यातील भाजप सरकार जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत महिला सुरक्षित राहणार नाहीत, असे त्या म्हणाल्या. यावेळी महिला काँग्रेसच्या अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Goa Congrss Agitation
Goa Football: महामारी नियमामुळे सेझा अकादमीस दिलासा

गोवा हे पर्यटनस्थळ (Goa Turisam) असून आता गोव्याला वाचवा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. मागील सात महिन्यांत बलात्काराची १४, अल्पवयीनांच्या अपहरणाची १५, तर विनयभंगाची १२ प्रकरणे घडली आहेत, याकडे नाईक (Bina Naik) यांनी लक्ष वेधले. गोव्याची वाटचाल उत्तर प्रदेश बनण्याच्या दिशेने चालू आहे, असे त्या म्हणाल्या. राज्यात गुन्हे वाढण्याचे एक कारण गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण ३० टक्के इतके आहे. त्यामुळे बलात्काराची प्रकरणे वाढत आहेत. राज्यात पुरेशी ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालये (Fast Trak Court) नाहीत. त्यामुळे महिलांना लवकर न्याय मिळत नाही. गोव्यात फॉरेन्सिक प्रयोगशाळा नाही. अशी प्रयोगशाळा असती तर पोलिसांनी नुकत्याच झालेल्या घटनेत ज्या मुलीचा बुडून मृत्यू झाला, तिच्याबाबत नेमके काय घडले, हे कळू शकले असते. तसेच अशा प्रकरणांचा तपास नीट होत नाही, अशी खंत नाईक यांनी व्यक्त केली.

Goa Congrss Agitation
Goa: विरोध असून देखील दुपदरी रेल्वेरुळांचे काम वेगात सुरु

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com