Goa : पारंपारिक पाण्याच्या स्रोतांचे संवर्धन आवश्यक

Goa: Conservation of traditonal sources of water is important
Goa: Conservation of traditonal sources of water is important

गुळेली : सत्तरी तालुक्यात (Sattari Taluka) तसे पाण्याचे दुर्भिक्ष नाहीच परंतु या तालुक्यातील पाण्याच्या साठ्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन (Water management) न झाल्याने ऐन उन्हाळ्यात त्याचबरोबर पावसाळ्यात (Monsoon) सुध्दा सत्तरीतील अनेक गावांत पाण्याचा प्रश्न सतावताना एकूण पाहणीत दिसून येते.

सत्तरीची जीवनदायीनी म्हादई नदी यामुळे कितीतरी गावे सुजलाम सुफलाम बनली आहे.या नदीबरोबरच रगाडा नदी ,पर्ये भागातून येणारी वाळवंटी नदी , वेगवेगळ्या ठिकाणी असलेले छोटे मोठे ओहळ , सत्तरीत अनेक ठिकाणी असलेल्या झरी यांचे जर योग्य प्रकारे व्यवस्थापन झाले तर सत्तरी तहानलेली कधी राहणार नाही.

सत्तरी तालुक्यातील वाळपई मतदान संघात सुद्धा अशा प्रकारच्या झरी आहेत. या झरींची जर सरकारी खात्याकडून व्यवस्थित उपाययोजना केली तर चोवीस तास पाणी संकल्पना प्रत्यक्षात उतरू शकते. नाहीतर ते फक्त निवडणूकीपूरतेच आश्वासन बनून राहते.

एकूण सरकारच्या दुर्लक्षामुळे म्हणा किंवा सरकारी पातळीवरील उदासिनतेमुळे ह्या झरी दुर्लक्षीतच राहिल्या आहेत.

गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातील धामसे या गावातील शांतादुर्गा मंदिराजवळ अशीच एक झर आणि तळी आहे तिला बारामाही पाणी असते. या झरीचा व तळीच्या पाण्याचा वापर तसा मोठ्याप्रमाणात गावकरी करतात असे नाही कारण गावापासून काही अंतरावर सदर झर आहे. देवस्थानच्या परिसरात ही जी तळी व झर आहे त्याचे योग्य प्रकारे संवर्धन केले तर या पाण्याचा उपयोग गावा साठी होऊ शकतो.

सध्या धामसे गावाला गुळेली पाणी प्रकल्पातून पाणी पुरवठा होत आहे. गुळेली पाणी  प्रकल्प हा म्हादयी नदिवर आहे.   म्हादई नदीचे पाणी काही प्रमाणात

कर्नाटक सरकारने सध्या वळवले आहे आणि भविष्यात जर म्हादई नदीचे पाणी कमी झाले तर अशा प्रकारच्या तळी,झरी या  पाण्याच्या स्त्रोतांचा शोध घेणे आवश्यक भासणार आहे. त्यासाठी या सारख्या पाण्याच्या स्त्रोतांचा आताच सरकारने विचार करावा. या झरीच्या व तळीच्या पाण्याचे योग्य

प्रकारे सरकार कडून व्यवस्थापन झाले तर धामसे गावाची तहान यावर भागवू शकते. भविष्यातील पाण्याचा प्रश्र्न सोडवायचा असेल तर सरकारने पाणी संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न आत्ता पासूनच सुरु केले पाहिजे. त्यासाठी अशा प्रकारचे पाण्याचे स्रोत हेरून त्यांची डागडूगी करण्यासाठी प्रामुख्याने पावले उचलणे आवश्यक आहे.

नाहीतर तहान लागली की विहिर खणणे असे होता कामा नये असे जाणकार म्हणतात.

धामसे येथील ग्रामस्थ सत्यवान गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी झरी आहेत त्या पाण्याचा उपयोग आम्ही देवस्थानात धार्मिक कार्यक्रम असताना करतो. या झरीच्या ठिकाणी पीव्हीसी पाईप लावून ते पाणी देवस्थानाजवळ आणलं जातं .सदर पाणी बारामाही असल्साने  देवस्थान कार्यात त्यांचा उपयोग होतो. या पाण्याचा योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास त्याचा गावाला उपयोग होईल असे ते म्हणाले.

तळीच्या दुरुस्ती साठी पंचायतीने ठराव घेतल्याची माहिती या भागाचे पंच विनोद गावकर यांनी दिली.पंचायतीतर्फे य या देवस्थानच्या तळीची दुरुस्ती करावी जेणेकरून या पाण्याचा उपयोग या भागातील गावकरी करु शकेल. या तळीची दुरुस्ती करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com