Goa: स्वयंपाकचा गॅस हजारांच्या उंबरठ्यावर, सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले

1 जुलै 21 रोजी 25.50 रुपये, 17 ऑगस्टला 25 रुपये, 6 ऑक्टोबरला 15 रुपये वाढ करण्यात आल्याने तो आता 913.50 रुपयांवर पोहोचला आहे. येत्या वर्षापर्यंत घरगुती स्वयंपाक गॅस (Cooking Gas) हजार रुपयांवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Goa: स्वयंपाकचा गॅस हजारांच्या उंबरठ्यावर, सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले
वर्षभरामध्ये 305 रुपयांनी घरगुती स्वयंपाक गॅस (Cooking Gas) महागला आहे.Dainik Gomantak

पणजी: सर्वसामान्य लोकांसाठी जीवनावश्‍यक गरज असलेला स्वयंपाक गॅसच्या (Cooking Gas) किंमतीत वारंवार वाढ झाल्याने देशातील जनतेचे कंबरडे मोडले आहे. गेल्या वर्षभरात स्वयंपाक गॅसमध्ये 8 वेळा वाढ झाली तर एकदा एप्रिल 21 मध्ये 10 रुपयांनी किंमत कमी झाली होती. ऑक्टोबर 20 मध्ये हा दर 608 रुपये होता तो ऑक्टोबर 21 मध्ये 913.50 रुपये झाला आहे. वर्षभरामध्ये 305 रुपयांनी घरगुती स्वयंपाक गॅस महागला आहे. या वर्षअखेरीपर्यंत तो हजार रुपयांवर जाऊ शकतो.

 वर्षभरामध्ये 305 रुपयांनी घरगुती स्वयंपाक गॅस (Cooking Gas) महागला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दराने गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी 1 ऑक्टोबर 20 मध्ये घरगुती स्वयंपाक गॅसची किंमत 608 रुपये होती. नोव्हेंबर महिन्यापर्यंत ती स्थिर होती. मात्र 1 डिसेंबर 20 रोजी त्यात एकदम 100 रुपयांनी वाढ होऊन त्याची किंमत 708 रुपयांवर पोहोचली. त्यानंतर 1 फेब्रुवारी 21 पर्यंत हा दर कायम होता; मात्र 4 फेब्रुवारी 21 रोजी त्यात पुन्हा 25 रुपये वाढ करण्यात आली व हा दर 733 रुपये झाला होता. पुन्हा 15 फेब्रुवारी 21 रोजी 50 रुपये, तसेच 1 मार्च 21 रोजी 50 रुपये वाढ केली गेली. त्यामुळे त्याची किंमत 833 झाली होती. 1 एप्रिल 21 रोजी 10 रुपये घट होऊन 823 रुपये जून 21 पर्यंत हा दर होता. 1 जुलै 21 रोजी 25.50 रुपये, 17 ऑगस्टला 25 रुपये, 6 ऑक्टोबरला 15 रुपये वाढ करण्यात आल्याने तो आता 913.50 रुपयांवर पोहोचला आहे. येत्या वर्षापर्यंत घरगुती स्वयंपाक गॅस हजार रुपयांवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Stories

No stories found.