Goa Corona Crisis: विमान वाहतुकीत प्रवाशांचे प्रमाण घटले!

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे देशी-परदेशी लोकांचे विमानामार्फत गोव्यात येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
Goa Corona Crisis:  Goa Airport
Goa Corona Crisis: Goa Airport Dainik Gomantak

Goa Corona Crisis: नवीन वर्षाच्या स्वागतानंतर गोव्यातील कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. शंभरीच्या आत मिळणारी रुग्णसंख्या आता 3000 ते 3500 च्या घरात मिळू लागली आहे. त्यामुळे गोव्यात नाईट कर्फ्यू (Night Curfew) किंवा लॉकडाऊन (Lockdown) लागण्याची भीती नागरिकांमध्ये असताना गोवा सरकारने (Goa Government) याबद्दलची माहिती जनतेला दिली. गोव्यात नाईट कर्फ्यू नसून कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध लावण्यात आले असून त्यांचे पालन करणे सर्वांसाठी अनिवार्य असणार आहे.

Goa Corona Crisis:  Goa Airport
Goa Elections: 'लोबोंचा भंडारी समाजाला संपवण्याचा प्रयत्न'

गोव्यातील सर्व सण, समारंभ, मेळावे आणि प्रचारसभा यांच्या उपस्थितीवर सरकारने काही निर्बंध लावले आहेत. प्रवासासाथी देखील विशेष तपासणी आणि देखरेख करण्यात येत आहे. या एकंदरीत परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय (International) विमानसेवेवर देखील परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची संख्या दररोज 10,000 पर्यंत घसरली आहे आणि ओमिक्रॉनचा धोका आणि कोविड प्रकरणांची वाढती संख्या यामुळे गेल्या 15 दिवसात निर्गमनांची संख्या देखील दररोज 60 पर्यंत कमी झाली आहे.

दाबोळी विमानतळाचे (Dabolim Airport) डिरेक्टर गगन मलिक यांच्याशी मीडियाने संपर्क साधला असता त्यांनी सध्याच्या विमानसेवेची (Airline) माहिती दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. परदेशी लोकांचे गोव्यात येण्याचे प्रमाण घटले आहे. कझाकस्तान, एअर अस्ताना आणि एससीएटी चार्टर रद्द करण्यात आले आहेत. मध्यंतरी दुबईवरून जे पर्यटक (Tourist) गोव्यात आले होते त्यांच्यानंतर परत कोणतेही दुबई पर्यटक गोव्यात आले नाहीत. याउलट आलेल्या लोकाना परत न्यायला रिकामी विमाने परदेशातून इकडे येत असल्याचे त्यांनी सांगितले. आत्तापर्यंत 9 रशियन चार्टर उड्डाणेंपैकी फक्त 2 गोव्यात आल्या आहेत. पुढे त्यांनी देशी आणि परदेशी पर्यटकांची सरकारच्या नियमांनुसार योग्य ती तपासणी करत असल्याची माहिती दिली. विमानसेवेतून गोव्यात दाखल होण्यासाठी कोरोना निगेटिव्ह अहवाल किंवा दोन डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com