Goa Corona: राज्यात काल 3025 कोविडग्रस्त ठणठणीत बरे

गोमंन्तक वृत्तसेवा
रविवार, 9 मे 2021

दिलासा देणारी एकच गोष्ट घडली आहे ती म्हणजे आज 3025 कोविडग्रस्त व्यक्ती ठणठणीत बऱ्या झाल्या. दिवसभरात 3 हजार 751 नवे कोविड बाधित सापडले. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, काल 8115 जणांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत राज्यात कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1612 वर पोचली आहे. 

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविड (Corona)प्रसार रोखण्यासाठी राज्यात 15 दिवसांची कडक संचारबंदी(Lockdoen) लागू करण्याची घोषणा केल्याच्या 24 तासांत जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी(CM) काल केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 यावेळेत खुली असतील, असे सांगितले होते मात्र आज जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात नेमक्या कोणत्या गोष्टींवर बंदी आहे हे शोधावे लागत होते. हा मनाई आदेश आज सकाळी 7 वाजल्यापासून 24 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू आहे. सध्या सुरू असलेल्या सगळ्याच गोष्टी सुरू राहणार असून सोयीस्करपणे खनिज वाहतुकीबाबत आदेशात मौन बाळगण्यात आले आहे. पोलिस महासंचालकांनी पत्रकार परिषद घेऊन आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाईची घोषणा केली असल्याने आदेशात तरतूद नसतानाही उद्यापासून जागोजागी जनतेची पोलिसांकरवी सतावणूक करण्याचा मार्ग मात्र सरकारने मोकळा केला आहे.(Goa Corona Total of 3025 people in Goa were discharged today)

सरकारने अधिक कठोर पावले उचलावीत, अशी जनतेची अपेक्षा होती. मात्र जनतेची सरकारने कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेतून निराशा केली आहे. समाजमाध्यमावर गेले दोन दिवस सरकारला विविध प्रकारे सल्ले दिले जात होते. जनता स्वतःहून अर्थचक्र थांबवले तरी चालेल, असे म्हणत होती तरीही सरकारने त्याकडे लक्ष दिले नसल्याचे दिसून आले. जिल्हाधिकाऱ्यांनी फौजदारी दंड संहितेच्या 144 कलमानुसार जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशात काल जाहीर केलेली संचारबंदी कुठेच नाही तर पाचपेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पूर्वी लग्न समारंभास 50 जणांच्या उपस्थितीत आणि पूर्वपरवानगी घेऊन परवानगी होती ती आता मागे घेण्यात आली आहे. सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, करमणूक, शैक्षणिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.

सरकारने गोव्याला मृत्यूच्या तोंडी सोडले; राहुल म्हांबरेंचे सरकारवर टिकास्त्र  

20 जणांच्या उपस्थितीत अंत्यसंस्काराला परवानगी असेल, असेही या आदेशात म्हटले आहे. यापूर्वीही तशी परवानगी होती. येत्या 10 मेपासून गोमंतकीय वगळता व कामानिमित्त नियमित ये-जा करणारे वगळता इतरांना 72 तासांत घेतलेले कोविड लागण नसल्याचे प्रमाणपत्र किंवा दोन्ही लसी घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवूनच राज्यात प्रवेश दिला जाणार आहे, असे आदेशात म्हटले आहे. मात्र असे प्रमाणपत्र न घेता रेल्वेमार्गे कुणी आला तर त्याची रेल्वेस्थानकावर चाचणी केली जाणार का, चाचणीचा अहवाल येईपर्यंत सरकार त्याची निवास व जेवण्याची व्यवस्था करणार का? या विषयी आदेशात अवाक्षरही नमूद केलेले नाही.

गोव्यात 24 तासात 56 रुग्णांचा मृत्यू; 2175 रुग्णांची कोरोनावर मात 

55 कोविडग्रस्तांचा मृत्यू

राज्य सरकारने कोरोना नियंत्रणासाठी आता कठोर पावले उचलली आहेत. काल शनिवारी पुन्हा 55 कोविडग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मागील आठ दिवसांत 444 व्यक्तींचा बळी गेला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीती पसरली आहे. दिलासा देणारी एकच गोष्ट घडली आहे ती म्हणजे आज 3025 कोविडग्रस्त व्यक्ती ठणठणीत बऱ्या झाल्या. दिवसभरात 3 हजार 751 नवे कोविड बाधित सापडले. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, काल 8115 जणांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत राज्यात कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1612 वर पोचली आहे. 

राज्यात सक्रिय बाधितांची संख्या 32 हजार 187 वर पोहोचलेली आहे. 191 व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. बाधित रुग्ण बरे होण्याची टक्केवारी राज्यामध्ये 70.74 टक्के आहे. आज जे 55जणांचा मृत्यू झाला. त्यातील 39 जण गोमेकॉ इस्पितळात उपचार घेत होते. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील 13 तर उत्तर गोवा इस्पितळातील उपचार घेणारा एक, इएसआय इस्पितळ, मडगाव येथे उपचार घेणारा एक व दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळात उपचार घेणाऱ्या एकाचा मृत्यू झाला. 

संबंधित बातम्या