Goa Corona Update: गोव्यात एका दिवसात 133 ‘कोरोना’बाधित

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 25 मार्च 2021

राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गीत व्यक्ती सापडू लागल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आज दिवसभरामध्ये पुन्हा एकदा तीन ‘कोरोना’बाधित रुग्णांचे निधन झाले.

पणजी : राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गीत व्यक्ती सापडू लागल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आज दिवसभरामध्ये पुन्हा एकदा तीन ‘कोरोना’बाधित रुग्णांचे निधन झाले. त्यामुळे कोरोना संसर्गित रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. 

आरोग्य खात्याने काल (बुधवारी) दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात 1901 कोरोना तपासणी (शॅंपल्स) करण्यात आली. त्यामध्ये 133 नवे कोरोना संसर्गित रुग्ण सापडले.  गेले सलग चार दिवस 100 पेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. कोरोना तपासणीचे प्रमाण वाढल्यामुळे हे रुग्ण वाढल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे. 

Goa Budget 2021: गोवा सरकार चार्टर विमानांचे पार्किंग आणि लँडिंग शुल्क भरण्यास तयार? 

दिवसभरामध्ये 58 कोरोनाबाधित बरे झाले व तिघा कोरोना बाधितांचे मृत्यू झाल्यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 821 वर पोचली आहे. आजच्या दिवशी राज्यात कोरोनावर उपचार घेणारे 1089 रुग्ण असून आतापर्यंत 54981 कोरोनाबाधित व्यक्ती बऱ्या झाल्या आहेत. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे टक्केवारी 96.63  टक्के एवढी झालेले आहे.

Goa Budget 2021: आर्थिक शिस्तीत कोटींची उड्डाणे 

 

संबंधित बातम्या