गोव्यात गेल्या चोविस तासात कोरोनाने गाठला उच्चांक

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 5 एप्रिल 2021

गोवा राज्यात आज 3 एप्रिल रोजी 219 नवे कोरोना रूग्ण सापडल्यामुळे राज्यात कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 1980 वर पोचली आहे.

पणजी: राज्यात गेले काही दिवस दररोज 200 पेक्षा जास्त नवे कोरोना रूग्ण सापडत आहेत. त्यामुळे राज्यासाठी ही चिंतेची बाब ठरत आहे. राज्यात आज 3 एप्रिल रोजी 219 नवे कोरोना रूग्ण सापडल्यामुळे राज्यात कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 1980 वर पोचली आहे. दिवसेंदिवस वाढणारे नवे कोरोना रुग्ण पाहता उद्या ही संख्या दोन हजाराच्या पार होईल.

गोव्याचे भवितव्य ‘आप’च्या हाती! 

आरोग्य खात्याने आज दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात दोन कोरोना बाधितांचे निधन झाले. त्यातील एक 60 वर्षीय इसम हे कोल्हापूरचे  असून त्यांना 28 मार्च रोजी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. तर दुसरे 85 वर्षीय इसम हे फोंडा येथील आहेत. त्यांना 31 मार्च रोजी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.

बेरोजगारीच्या अहवालावर सीएमआयई संस्थेला द्यावं लागणार गोवा राज्यसरकारला स्पष्टीकरण

आज दिवसभरात 2062 जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यात 219  नवे कोरोनाग्रस्त सापडले. तर आज दिवसभरात 151 कोरोना बाधित व्यक्ती बरे झाले. आज कोरोनामुळे दोघांचे निधन झाल्यामुळे कोरोनामुळे राज्यात निधन पावलेल्या व्यक्तींची संख्या 834 वर पोचली आहे. राज्यात कोरोनातून बरे होण्याची टक्केवारी 95.21 इतकी आहे. राज्यात कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या 1980 एवढी असल्याचे आरोग्य खात्याने कळवले आहे.

संबंधित बातम्या