राज्यात करोनामुळे होणारा मृत्यूदर आटोक्यात

आजच्या दिवशी राज्यात ७७९ सक्रिय कोरोना रुग्ण असून कोरोना बरे होण्याची टक्केवारी 97.68 टक्के आहे.
राज्यात करोनामुळे होणारा मृत्यूदर आटोक्यात
Goa Corona Update Dainik Gomantak

पणजी: राज्यात आज कोरोनामुळे एका कोरोना बाधितांचे निधन झाले. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज 3,860 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. जाहिर अहवालानुसार आज 60 नवे कोरोना बाधित सापडले तर 52 कोरोना बाधित बरे झाले. आजच्या एका कोरोना मृत्यूमुळे आत्तापर्यंत कोरोनामुळे निधन झालेल्यांची संख्या 3,323 झाली आहे. आजच्या दिवशी राज्यात ७७९ सक्रिय कोरोना रुग्ण असून कोरोना बरे होण्याची टक्केवारी 97.68 टक्के आहे.

राज्यातील एकूण लसीकरण 19,71,652

राज्यात आजपर्यंत 19,71,652 इतके लसीकरण झाले आहे. यात 12,15,405 लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस तर ७,५६,२४७ लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. आज ता.7 ऑक्टोंबर रोजी 7,447 इतके लसीकरण झाले.

Related Stories

No stories found.