Goa Corona Update: गोव्यात हाताच्या बोटावर मोजण्याएवढे अ‍ॅक्टिव्ह कोरोना रूग्ण, जाणून घ्या ताजी आकडेवारी

नव्याने वाढ होणाऱ्या रूग्णांची संख्या घटल्याने राज्यातील सक्रिय कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
Goa Corona Update
Goa Corona UpdateDainik Gomantak

गोव्यात कोरोना संसर्गाचा जोर ओसरला आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यात केवळ 1 किंवा 2 नवीन कोरोना बाधित रूग्णांची नोंद होत आहे. तसेच, काही दिवसांपासून मृत्यूची नोंद देखील झालेली नाही. नव्याने वाढ होणाऱ्या रूग्णांची संख्या घटल्याने राज्यातील सक्रिय कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

बुधवारी (दि.01) राज्यात केवळ एका नव्या कोरोना रूग्णांची वाढ झाली असून, उपचारानंतर बरा झालेल्या एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला गोव्यात हाताच्या बोटावर मोजण्याएवढे अ‍ॅक्टिव्ह कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

Goa Corona Update
Margao: केरळचा मृत युवक मडगावात जिवंत सापडला; अंत्यसंस्कारही केले होते, 8 महिन्यांनी रहस्य मात्र कायम

गोवा आरोग्य विभागाने (Goa Health Department) बुधवारी सांयकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात सध्याच्या घडीला केवळ सहा कोरोनाबाधित रूग्णांवर (Active Corona Cases In Goa) उपचार सुरू आहेत. राज्यात आजवर 2 लाख 59 हजार 122 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 55 हजार 103 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजवर 4,013 जणांचा  कोरोनामुळे  मृत्यू झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 98.45 टक्के एवढा झाला आहे.

आज दिवसभरात 423 प्रयोगशाळा नमूने तपासण्यात आले आहेत. तर, आजवर तब्बल 21 लाख 40 हजार 99 नमूने तपासण्यात आले आहेत.

Goa Corona Update
Union Budget 2023: अर्थसंकल्पाबाबत गोव्यातील जाणकार काय म्हणाले? CM सावंत यांनीही दिली प्रतिक्रिया

देशात केवळ 1,783 सक्रिय कोरोना रूग्ण

भारतातील कोरोनाची संख्या देखील कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 111 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. देशात सध्याच्या घडीला 1,783 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून 4.46 कोटी कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे.

भारताचा आठवड्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 0.07 टक्के एवढा कमी झाला आहे. तर, रिकव्हरी रेट वाढून 98.81 टक्के एवढा झाला आहे. दरम्यान, कोरोनामुळे देशात आजवर 5 लाख 30 हजार 740 जणांनी आपला जीव गमावला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com