कोरोना नियंत्रणासाठी सरकारने राज्यात 3 कोटी 30 लाख रुपये केले मंजूर

काल पर्वरीत झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कोरोना नियंत्रणासाठी सरकारने राज्यात 3 कोटी 30 लाख रुपये केले मंजूर
कोरोना नियंत्रणासाठी सरकारने राज्यात ३ कोटी ३० लाख रुपये केले मंजूर Dainik gomantak

Panjim: राज्यातील (State) कोरोना (Corona) नियंत्रणासाठी राज्यमंत्रीमंडळाने (Cabinet) 3 कोटी 30 लाख रुपये मंजूर केले आहेत. काल पर्वरीत झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील कोरोना नियंत्रणासाठी (Corona Control) गरज असलेल्या सर्व सुविधा उल्पब्ध करणे, गरज असलेली नव नवीन अत्याधुनीक यंत्रे खरेदी करणे, आरटीपीसीआर (RTPCR) कोरोना चाचणीसाठी जादा उपकरणे उपलब्ध करणे आदींसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे.

कोरोना नियंत्रणासाठी सरकारने राज्यात ३ कोटी ३० लाख रुपये केले मंजूर
गोव्यात सेनेचेही एकला चलो रे !

राज्यात कोरोना नियंत्रणात असून सक्रीय कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा खाली येत आहे. सरकारने कोरोना नियंत्रणासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा राज्यात वेळोवेळी उपलब्ध केल्या असून राज्यात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या बरीच वाढली आहे.

अल्पसंख्याक विकास महामंडळासाठी 7 पदे

राज्य सराकरने राज्य अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी 7 पदांच्या निर्मितीला मान्यता दिली आहे. व्यवस्थापकीय संचालक पदासह इतर 6 पदे भरण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. या महामंडळाच्या स्थापनेनंतर एकही पद भरले गेले नव्हते.

Related Stories

No stories found.