Goa vaccination : राज्य कोरोना मुक्त करण्याचे ध्येय

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्यात असलेल्या परदेशी नागरिकांना (Foreign People) तसेच भिकाऱ्यांना (Beggars) कोरोना प्रतिबंधक लस (Corona vaccine) देण्यात येणार आहे.
Corona Vaccine
Corona VaccineDainik Gomantak

पणजी - राज्याला पूर्ण कोरोना मुक्त (Corona) करण्याचे ध्येय गोवा सरकारने (Goa Government) ठेवले असून राज्यात असलेल्या 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला कोरोना प्रतिबंधक लस (Corona vaccine) देऊन गोवा राज्यात कोरोना नियंत्रणात यावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्यात असलेल्या परदेशी नागरिकांना (Foreign People) तसेच भिकाऱ्यांना (Beggars) कोरोना प्रतिबंधक लस (Corona vaccine) देण्यात येणार आहे.

Corona Vaccine
Goa Curfew: जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी झाल्यावरच समजणार काय सुरू काय बंद

त्या संबंधात जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच आदेश काढला आहे. तालुक्यातील मामलेदारांना तालुक्यातील विदेशी नागरिक तसेच ज्यांच्याकडे भारतीय रहिवासी म्हणून कागदपत्रे नाहीत अशा नेपाळ व इतर देशातील व्यक्ती आणि भिकारी या सगळ्यांची नोंदणी करून त्यांना लस देण्याची तयारी करण्याचे आदेश मामलेदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मामलेदारांनी पंचायत क्षेत्रातील तलाठी आणि पोलिसांना गावा - गावात जाउन जे कोण विदेशी नागरिक राहतात किंवा भिकारी सापडतात त्यांची नोंद करून त्यांना लस देण्याची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Corona Vaccine
Goa Monsoon Update: चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये 18वर्षावरील सर्व भिकारी आणि नेपाळी , बांगलादेशी तसेच इतर विदेशातील नागरिक यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. पहिला डोस दिल्यानंतर काही काळाने दुसरा डोसही देण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com