Goa: 31 जुलैपर्यंत साडे अकरा लाख व्यक्तींना देणार कोरोना लस- सावंत सरकार

राज्यात जुलैच्या पहिल्या पंधरा दिवसात तब्बल 2,18,955 लसीकरण झाले आहे.
Goa: 31 जुलैपर्यंत साडे अकरा लाख व्यक्तींना देणार कोरोना लस- सावंत सरकार
VaccinationDainik Gomantak

पणजी: राज्यात जुलैच्या पहिल्या पंधरा दिवसात तब्बल 2,18,955 लसीकरण झाले आहे. गोव्यातील (Goa) 18 वर्षावसरील सुमारे साडेअकरा लाख व्यक्तींना 31 जुलैपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्याचा संकल्प मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी केला आहे. आणि त्यानुशंगाने लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत 11,37,125 लसीकरण झालेले असून त्यात 9,43,155 लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस तर 1,93,970 लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. आज 15 रोजी 10,902 लसीकरण झाले.

एका बाजुला राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु असून दुसरीकडे कोरोना चाचण्याही वाढवण्यात आल्या आहेत. 1 जुलै ते 15 जुलै या पंधरा दिवसात राज्यात 66,034 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. जाहिर अहवालानुसार या पंधरा दिवसात 2,652 नवे कोरोना बाधित सापडले तर 3099 कोरोना बाधीत बरे झाले. या पंधरा दिवसात ४८ कोरोना बाधितांचे निधन झाले.

Vaccination
Goa: पूर्ण लसीकरण केलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा: विश्वजित राणे

1 जुलै ते 15 जुलै लसिकरण व कोरोना आकडेवारी

लसीकरण- 2,18,955

कोरोना चाचण्या -66,034

नवे कोरोना रुग्ण- 2,652

बरे झालेले कोरोना रुग्ण- 3,099

कोरोनामुळे मृत्यू - 48

Vaccination
Goa Vaccination: मुंबईहून कोविड लसीचे 17 बॉक्स राज्यात दाखल

आज ता.१५ जुलै चे लसीकरण व कोरोना आकडेवारी -

आत्तापर्तंयचे एकूण कोरोना बाधीत - 1,69,341

बरे झालेले कोरोना एकूण कोरोना बाधीत- 1,64,460

आत्तापर्यंतचे एकूण लसीकरण - 11,37,125

आजचे लसीकरण -10,902

आज पहिला डोस - 5,992

आज दुसरा डोस - 4,910

आजच्या कोरोना चाचण्या- 4,063

नवे कोरोना बाधीत- 126

बरे झालेले कोरोना बाधीत - 134

कोरोना बळी- 1

आत्तापर्यंतचे कोरोना बळी- 3,102

आजचे सक्रिय कोरोना बाधीत -1,779

कोरोना बरे होण्याची टक्केवारी - 97.12

Related Stories

No stories found.