गोवा: कोरोनाग्रस्ताचा मृतदेह अत्यंसंस्कार न करताच स्मशानभुमीतून आणला घरी

Goa Coronagrastas body brought home from crematorium without cremation
Goa Coronagrastas body brought home from crematorium without cremation

श्रीस्थळ पंचायत क्षेत्रातील करोनाग्रस्ताचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशान भुमीकडे नेऊन अंत्यसंस्कार न करताच पुन्हा घरी आणण्यात आला. श्रीस्थळ पंचायत क्षेत्रातील करोनाग्रस्ताचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशान भुमीकडे नेऊन अंत्यसंस्कार न करताच पुन्हा घरी आणण्यात आला. अशी दुर्दैवी घटना आज काणकोणात (Canacona) घडली. पंचायत व सरकारी निधीतून या स्मशानभुमीची उभारणी करण्यात आली असल्याने समाजातील सर्व लोकाना या स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार आहे अशी भुमिका मामलेदार विमोद दलाल (Vimod Dalal) यांनी घेऊन पंचायत सचिव संदीप देसाई (Sandeep Desai) याला घटनास्थळी पाचारण केले. (Goa Coronagrastas body brought home from crematorium without cremation)

मात्र स्मशानभुमीची गेटला कुलूप असल्याने माजी सरपंच प्रशांत देसाई गेट उघडून मृतदेह असलेले वाहन स्मशान भुमीत नेले. त्यावेळी काहीनी स्मशानभुमीत असलेली लाकडांनी सरण रचण्यास सुरूवात केली. मात्र त्यावेळी पंच देवेंद्र नाईक,माजी उपसयपंच संजू नाईक व पंचायत सचिव वडामळ येथे पंचायत कार्यालयाजवळ होते. श्रीस्थळ येथील काहीनी या स्मशानभुमीत त्याच्या मृतदेहावर अंतीम संस्कार करण्यास विरोध केला होता.त्याला पंचायतीच्या काही सदस्यानी साथ दिल्याने त्या मृताच्या पुत्राने वाद करून आपल्याला वडीलांचा अंतीम संस्कार करण्यास स्वारस्य नसल्याचे सांगून स्मशानभुमीतून मृतदेह परत आणला सद्या तो मृतदेह तिरडीवर वाहनात असल्याचे माजी सरपंच प्रशांत देसाई यांनी सांगितले.अंत्यसंस्कारासाठी नेलेले पार्थीव परत घरी आणण्याची ही पहिलीच घटना काणकोणात घडली आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com