Goa News
Goa News Dainik Gomantak

Goa News: कुठ्ठाळीत वाढतोय मजुरांचा लोंढा!

Goa News: बसथांब्यावर गर्दी : झुआरीनगर, मांगूरहीलच्या दिशेने वाटचाल

Goa News: सकाळी आठ वाजल्यापासून जमणाऱ्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या लोंढ्यावरून कुठ्ठाळी सध्या हळूहळू झुआरीनगर, वरुणापुरी व मांगूरहीलच्या दिशेने वाटचाल करू लागल्याची चाहूल लागते आहे.

कुठ्ठाळी येथील श्री गणेश मंदिरासमोर बसथांब्यावर हे मजूर सकाळी आठ वाजल्यापासून रोजंदारीवर नेणाऱ्या ठेकेदारांची वाट बघत असतात. या मजुरांची रोजंदारी सातशे रुपयांपासून सुरू होते. विशेषतः बांधकाम व्यावसायिक किंवा कंत्राटदार, दलाल या ठिकाणी येऊन मजुरांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जातात. त्यामुळे सकाळपासून येथे होणारी मजुरांची गर्दी साडे नऊपर्यंत ओसरते.

भाडेकरूंबाबत घरमालक उदासीन! :

यापूर्वी मजुरांची भाड्याच्या खोलीत भांडणे होऊन नंतर त्याचे रूपांतर खुनात झाल्याची प्रकरणे नोंद आहेत. सध्या वाढत्या मजुरांच्या संख्येवर कुणाचाही अंकुश नसून प्रसंगी गंभीर समस्या उद्‌भवण्याची शक्यता आहे.

प्रत्येक घरमालकाने आपल्या घरात राहात असलेल्या भाडेकरूंची पडताळणी करणारी संपूर्ण माहिती फॉर्म मध्ये भरून पोलिसांना देणे सक्तीचे आहे. मात्र, घरमालक त्याकडे दुर्लक्ष करतात.

Goa News
Nesai Murder Case: नेसाय येथे सापडला सडलेला मृतदेह; पोलिसांनी व्यक्त केला खुनाचा संशय

खांद्यावर बॅग

  • काहीजण तर थेट बस पकडून वेर्णा औद्योगिक वसाहतीतील कंपनीत कामाला जातात. प्रत्येक मजुराच्या खांद्यावर बॅग लटकलेली दिसते. त्यामुळे तो रोजंदारीवर राबणारा मजूर वाटत नाही.

  • हे मजूर बहुतेक बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील असून कुठ्ठाळीत भाड्याच्या खोल्यांमध्ये वास्तव्य करतात. एकाच खोलीत अनेकजण दाटीवाटीने राहतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com