Goa Court: सोनसोडोतील कब्रस्तान सहा महिन्यांत पूर्ण करा!

Goa Court: वेळेत काम न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
Goa Court | Sonsodo Kabrastan
Goa Court | Sonsodo KabrastanDainik Gomantak

Goa Court: सोनसोडो येथील नियोजित जागेतील कब्रस्तानचे बांधकाम राज्य नगरविकास यंत्रणा (जीसुडा) व सार्वजनिक बांधकाम खात्याने (पीडब्‍ल्यूडी) 6 महिन्यांत पूर्ण करावे. तसेच मडगाव पालिकेने त्याला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा आदेश गोवा खंडपीठाने काल दिला.

दरम्यान, हे काम वेळेत पूर्ण न झाल्यास ‘जीसुडा’चे सदस्य सचिव, पीडब्ल्यूडी कार्यकारी अभियंता व पालिका मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल व त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई (Action) केली जाईल असा इशारा दिला आहे. कामाचा अहवाल येत्या 29 नोव्हेंबरला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Goa Court | Sonsodo Kabrastan
Kiran Kandolkar: कार्यकर्ते हाच माझा पक्ष; अन्‍य पक्षांची मला गरज नाही!

‘जीसुडा’चे व्यवस्थापकीय संचालक व पीडब्ल्यूडी अधीक्षक अभियंता यांच्या अधिकार क्षेत्रात हे बांधकाम (Construction) होणार आहे. काम वेळेत पूर्ण न झाल्यास त्यांना जबाबदार धरले जाईल. त्यामुळे काही अडचणी आल्यास त्या त्वरित खंडपीठासमोर मांडण्यास मुभा देण्यात येत आहे.

मुख्याधिकारी तसेच पालिका अभियंतेही तेवढेच जबाबदार असतील. हे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी या कामात सहकार्य करावे, असे आदेशात खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com