पोलिस निरीक्षका विरोधातच,न्यायालयाकडून जामीनपात्र वॉरंट

न्यायालयात खटल्यावरील सुनावणी तपास अधिकाऱ्यांची जबानी नोंद करण्यासाठी 6 डिसेंबर 2021 रोजी ठेवण्यात आली होती
Goa Court ordered to police inspector for present in court during hearing of related case 

Goa Court ordered to police inspector for present in court during hearing of related case 

Dainik Gomantak

न्यायालयात खटल्यावरील सुनावणीवेळी बंदोबस्ताचे कारण देऊन उपस्थित राहण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णा सिनारी हे टाळत असल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत पणजी (Panjim) अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांना जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. 2016 साली जुने गोवे (Old Goa) पोलिस स्थानकाच्या क्षेत्रातील एका गुन्ह्याच्या खटल्यावरील सुनावणी सुरू झाली आहे व त्यास तीनवेळा अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने दखल घेतली आहे. (Goa Court ordered to police inspector for present in court during hearing of related case )

<div class="paragraphs"><p>Goa Court ordered to police inspector for present in court during hearing of related case&nbsp;</p></div>
मंत्र्याचे ‘सेक्स स्कॅंडल’ प्रकरण राज्यपालांकडे,काँग्रेस आक्रमक

न्यायालयात खटल्यावरील सुनावणी तपास अधिकाऱ्यांची जबानी नोंद करण्यासाठी 6 डिसेंबर 2021 रोजी ठेवण्यात आली होती, तेव्हा पोलिस निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी पणजी पोलिस स्थानकामार्फत बिनतारी संदेश पाठवून ते अतिमहनीय व्यक्तींच्या बंदोबस्तासाठी ड्युटीवर असल्याने येऊ शकत नसल्याचे कळविले होते. गेल्या सहा वर्षांपासून खटल्यावरील सुनावणी सुरू आहे व ती अंतिम टप्प्यात आहे. तपास अधिकाऱ्याची जबानी नोंद होणे बाकी आहे.

या खटल्यावरील सुनावणीवेळी जबानी नोंद करण्यासाठी 5 फेब्रुवारी 2021 रोजी पोलिस निरीक्षक कृष्णा सिनारी यांना उपस्थित राहावे असे न्यायालयाने कळविले होते. मात्र, त्यावेळी ते गैरहजर राहिले. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एडगर फर्नांडिस यांनी पुन्हा 6 ऑक्टोबर 2021 रोजी तपास अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची सूचना करावी असे स्पष्ट सांगितले होते. तरीही तपास अधिकारी बंदोबस्ताच्या ड्युटीसाठी व्यस्त असल्याचे बिनतारी संदेश पाठवून अनुपस्थित राहत होते. अधिकारी वारंवार तीच कारणे देऊन अनुपस्थित राहत असल्याने खटल्यावरील सुनावणी प्रलंबित राहत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com