प्रतिमा कुतिन्होंना अनुपस्थितीबाबत ताकीद

सांगे येथील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणात पीडित तरुणीच्या मदतीसाठी गेलेल्या प्रतिमा कुतिन्हो व इतरांनी पीडितेच्या आईसोबत छायाचित्र काढले होते
प्रतिमा कुतिन्होंना अनुपस्थितीबाबत ताकीद
प्रतिमा कुतिन्होंनाDainik Gomantak

पणजी: पीडित तरुणीची ओळख उघड केल्याप्रकरणी बाल न्यायालयात प्रलंबित असलेल्या सुनावणीवेळी हजर न राहिल्याप्रकरणी संशयित प्रतिमा कुतिन्हो हिला अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. त्यानुसार पोलिसांनी तिला काल न्यायालयात हजर केले. पुढील सुनावणीवेळी हजर राहण्याची ताकीद देऊन हे वॉरंट न्यायालयाने रद्द केले व पुढील सुनावणी 1 डिसेंबरला ठेवली आहे.

या खटल्यावरील सुनावणीवेळी आरोपपत्रातील पाचपैकी चार संशयित न्यायालयात उपस्थित राहिले होते, तर संशयित प्रतिमा कुतिन्हो या अनुपस्थित राहिल्या होत्या. तिला न्यायालयाने जामीन मंजूर करताना सुनावणीवेळी उपस्थित राहण्याची अट घालण्यात आली होती. या खटल्यावरील सुनावणीवेळी तिला उपस्थित न राहण्याची मुभा द्यावी यासाठी अर्ज केला नव्हता. ती मागील सुनावणीला उपस्थित राहिली नसल्याने बाल न्यायालयाने 29 ऑक्टोबर 21 रोजी तिच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करून काल 12 नोव्हेंबरला तिला दुपारी 2.30 वा. उपस्थित करण्याचे निर्देश महिला पोलिसांना दिले होते. त्यामुळे गेले दोन दिवस या पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला हजर केले. न्यायालयाने संशयित प्रतिमा कुतिन्हो हिची बाजू ऐकून घेऊन काही काळ न्यायालयातच थांबवून ठेवत तिच्या अर्जावरील सुनावणी कामकाजाच्या अखेरीस ठेवली.

प्रतिमा कुतिन्होंना
19 वर्षीय युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू

सांगे येथील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणात पीडित तरुणीच्या मदतीसाठी गेलेल्या प्रतिमा कुतिन्हो व इतरांनी पीडितेच्या आईसोबत छायाचित्र काढले होते व ते वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. याप्रकरणाला आक्षेप घेण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत प्रतिमा कुतिन्हो हिच्यासह पाच जणांविरुद्ध लैंगिक अत्याचार तसेच पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करून तपास केला होता. महिला पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्रही सादर केले आहे.

प्रतिमा कुतिन्होंना
लुईझिन फालेरोंना TMCकडून राज्यसभेचं तिकीट

माझ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा हा राजकीयप्रेरित आहे. न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पोलिस माझ्या शोधात होते. राजकीय दबाव आणून माझा आवाज दडपण्याचे हे एक षडयंत्र आहे. मी लढाऊ महिला आहे. न्यायालयाने माझी बाजू ऐकून घेऊन अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द केले आहे.

- प्रतिमा कुतिन्हो, ‘आप’च्या नेत्या

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com