Goa Court Order: ....तरीही वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार; जाणून घ्या गोवा न्यायालयाचा नवा आदेश

नवरा बायको जरी एकमेकांपासून वेगळे झाले तरी त्यांच्या मुलांवर दोघांचाही तितकाच अधिकार असतो.
court
court Dainik Gomantak

पणजी : जोडपे विभक्त झाल्यानंतर महत्वाचा मुद्दा असतो त्यांच्या मुलांचा. नवरा बायको जरी एकमेकांपासून वेगळे झाले तरी त्यांच्या मुलांवर दोघांचाही तितकाच अधिकार असतो. मात्र गोव्यातील एका महिलेने आपल्या विभक्त झालेल्या पतीला मुलाला भेटण्यापासून विरोध केला आहे.

तिच्या म्हणण्यानुसार, तिच्या पतीमुळे मुलाला मानसिक त्रास होऊन मुलाची चिडचिड होते. त्यामुळे तिने पतीच्या भेटीचे अधिकार रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयात सादर केला. यावेळी वडिलांच्या भेटीचा हक्क केवळ मुलाची चिडचिड झाल्यामुळे रद्द करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

(Goa court order regarding children after separation of couple)

court
Goa BJP: अबब! शंभर कोटींची मानहानी? 'खरी कुजबूज'

“वडिलांचे भेटीचे अधिकार केवळ या कारणावरून रद्द करणे शक्य नाही कारण पतीचाही मुलावर तितकाच अधिकार आहे. मुलाला वडिलांसोबत एकत्र राहण्यासाठी वेळ मिळाला नाही यामुळे ही भावना मुलामध्ये येऊ शकते असे, न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणी, 'एफ' न्यायालय, म्हापसा, टेसी मास्करेन्हास यांनी सांगितले.

"अशा प्रकारे, पती-पत्नीला कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीने सहाय्य केले तर ते योग्य होईल जे त्यांना मुलाशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यास मदत करेल जेणेकरून मूल दोन्ही पालकांशी योग्य प्रतिसाद देईल, असे न्यायालयाने म्हटले.

court
Goa IFFI Festival: प्रतिनिधी नोंदणी 5 हजारांकडे! उद्‍घाटनाला सात दिवस बाकी

पक्षकारांना पणजी येथील मध्यस्थी केंद्रासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले, ज्यात “एक प्रशिक्षित मध्यस्थ पक्षकारांना मुलाशी प्रभावी भेट घडवून आणण्यास मदत करेल जेथे मुलाला वडिलांसोबत वेळ घालवता येईल”.

वडिलांना गेल्या वर्षी 23 डिसेंबर रोजी भेटीचे अधिकार देण्यात आले होते, दरम्यान आईच्या उपस्थितीत दर रविवारी सकाळी 10 ते दुपारी 12 च्या दरम्यान अल्पवयीन मुलाला भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. प्रतिवादीला भेटीचे अधिकार देण्यात आले कारण मूल लहान वयाचे आहे आणि त्याला दोन्ही पालकांचे प्रेम आणि आपुलकी आवश्यक आहे,असे न्यायालयाने यावेळी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com