Goa Covid -19: आज कोरोनामुळे 2 रुग्णांचा मृत्यू, तर 86 नवे रुग्ण आढळले

आत्तापर्यंत राज्यात कोरोनामुळे 3,212 लोक दगावले (Goa Covid -19)
Goa Covid -19: आज कोरोनामुळे 2 रुग्णांचा मृत्यू, तर 86 नवे रुग्ण आढळले
Goa Covid -19Dainik Gomantak

Goa Covid -19: राज्यात आज कोरोनामुळे दोन कोरोना बाधितांचे निधन झाले. तर 86नवे कोरोना बाधित सापडले. आरोग्य खात्याने (Health Department) दिलेल्या माहितीनुसार आज 5727 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. जाहिर अहवालानुसार आज 86 नवे कोरोना बाधित सापडले तर 82 कोरोना बाधित बरे झाले. आजच्या दोन कोरोना मृत्यूमुळे आत्तापर्यंत कोरोनामुळे निधन झालेल्यांची संख्या 3212 झाली आहे. आजच्या दिवशी राज्यात 856 सक्रिय कोरोना रुग्ण असून पणजी परिसरात 62, मडगाव परिसरात 69 व शिवोली परिसरात 50 कोरोना रुग्ण (Corona Patient) आहेत. इतर काही ठीकाणी 50 च्या खाली कोरोना रुग्ण आहेत. राज्यात कोरोना बरे होण्याची टक्केवारी 97.67 टक्के आहे.

Goa Covid -19
Goa: ३४ टक्के लोकांना लसीचा दुसरा डोस

लसीकरण 16,29,082 झाले

राज्यात आजपर्यंत 16,29,082 येवढे लसीकरण (Vaccination) झाले आहे. यात 11,60,415लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस तर 4,68,667 लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. आज ता. 8 सप्टेंबर रोजी 9,718येवढे लसीकरण झाले. यात दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तर पहिला डोस क्वचीतच लोक घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com