GOA COVID-19: २१ मुद्यांची सरकारला सूचना करून काहीही साध्य होणार नाही

दैनिक गोमंतक
गुरुवार, 6 मे 2021

विरोधी आमदारांना भेटण्यास मी कधी नकार दिलेला नाही.

पणजी: कोविड महामारीच्या (Covid epidemic) काळात सरकारी यंत्रणेला सहकार्य करण्याऐवजी विरोधकांना राजकारण करायचे आहे. त्यामुळे काल बैठक (Meeting) घेऊन त्यांनी राजकारणाचा एक अंक पार पाडला, अशी टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. विरोधी आमदारांना भेटण्यास मी कधी नकार दिलेला नाही. ते आमदार मला भेटून सूचना करू शकले असते. यापूर्वी कोविड (covid-19) व्यवस्थापनासाठी घेतलेल्या बैठकांना गोवा फॉरवर्डचा (Forward) प्रतिनिधी उपस्थित राहत नव्हता. (GOA COVID-19: Nothing will be achieved by informing the government on 21 issues) 

गोवा: पावसाळ्यापूर्वी निम्मा डोंगर संपविण्याचे ‘जी सूडा’चे लक्ष्य

काल, मात्र विरोधी पक्षाने बोलावलेल्या बैठकीला त्या पक्षाचे आमदार पोहोचले. त्यांना आता काही तरी राजकारण करण्याची संधी आहे, असे वाटल्याने ते एकवटले. त्यांच्या बैठकीला केवळ प्रसिद्धी मिळण्यापलीकडे काही मुल्य नाही. त्यांनी केलेल्या अनेक सूचना याआधीच अंमलात आणल्या आहेत तर काही सूचना अव्यवहार्य आहेत. राज्यात रुग्णांना चांगली आरोग्य सेवा कशी द्यायची यासाठी सरकार रात्रंदिवस काम करत आहे. चांगल्या सूचनांचे स्वागत आहे, पण केवळ राजकारण करण्यासाठी सरकारवर उठसूठ टीका करायची आणि नंतर सूचना केल्याचा आव आणायचे हे स्वीकारार्ह नाही.

डॉक्टरांच्या चोवीस तास  उपस्थितीत कोविड भरतीपूर्व हॉस्पिटल सुरू

जनतेच्या भल्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. प्रत्येक आमदाराने आपल्या भागातील जनतेने लसीकरण (vaccination) करने. लक्षणे आढळल्यास ताबडतोब चाचणी करून घेणे, गृह विलगीकरणातील व्यक्तीने मुक्तपणे फिरू नये याकडे जरी लक्ष दिले तरी तेवढी सरकारला मदत होऊ शकते. असे काही न करता केवळ बैठक घेत २१ मुद्यांची सरकारला सूचना करायची आणि त्यातून प्रसिद्धी मिळवायची यातून काही साध्य होणार नाही, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले. 

 

 

संबंधित बातम्या