Goa Covid-19 Update: पाच बळींमुळे वाढली चिंता; सभांमध्ये नियमांचे तीनतेरा

सणासुदीत गोव्यावर कोरोनाचे संकट, केरळमधून येणाऱ्यांना क्वारंटाईन सक्तीचे
Goa Covid-19 Update: पाच बळींमुळे वाढली चिंता; सभांमध्ये नियमांचे तीनतेरा
Goa Covid-19 updateDainik Gomantak

पणजी: गणेशचतुर्थी (Ganesh Chaturthi) जवळ आल्याने सणासुदीसाठी (Festival) बाजारपेठांमध्ये साहित्य खरेदीसाठी होणारी लोकांची झुंबड तसेच राजकीय सभांना वाढत असलेली गर्दी कोरोना (Covid-19) महामारीच्या पार्श्वभूमीवर चिंतेचा विषय ठरत आहे. रविवारी कोरोनामुळे राज्यात पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे गेल्या काही दिवसांत नियंत्रणात असलेला कोरोना पुढे डोके वर काढणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी कोरोनाचे भान ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

Goa Covid-19 update
Goa Election: इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे भाजपला सतावतेय बंडखोरांची भिती

राज्यात कर्फ्यू लागू असूनही कोविड-19 च्या मार्गदर्शक सूचनांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. केरळमध्ये कोविडचा धोका वाढल्याने कोरोनाविषयक तज्‍ज्ञ समितीने केरळमधून येणाऱ्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची शिफारस सरकारला केली आहे. त्यामुळे ऐन गणेशचतुर्थी सणावेळी कोरोनाच्या संकटाचे सावट कायम आहे. सरकारने 9 मे 2021 रोजी राज्यस्तरीय संचारबंदी (कर्फ्यू) लागू केली होती.

Goa Covid-19 update
Goa Monsoon Updates: तीन दिवस ऑरेंज अलर्ट; मच्छीमारांना इशारा

कोरोना महामारी नियंत्रणात येऊ लागली, त्यानुसार त्यात सरकार शिथिलता आणत गेले. मात्र, अजूनही ही महामारी संपलेली नाही. गेल्या आठ दिवसात राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 3 व त्यापेक्षा कमी होते. मात्र, काल अचानक ही संख्या 5 वर गेल्याने पुन्हा धोका वाढू लागला आहे. कोरोनाबाधितांची संख्या शंभराच्या आत असल्याने जरा दिलासादायक असले तरी सध्या राज्यांमधील बाजारपेठेत होत असलेली गर्दी ही चिंतेची बाब ठरू लागली आहे.

केरळमधून येणाऱ्यांना क्वारंटाईन सक्तीचे

केरळमध्ये डेल्टा प्लस व इतर व्हेरिएंट विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने खबरदारी म्हणून तज्ज्ञ समितीने केरळहून गोव्यामध्ये येणाऱ्यांना क्वारंटाईन सक्तीचे करण्याची शिफारस सरकारला केली आहे. यापूर्वी त्यांना प्रवेश करण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणी सक्तीची केली होती. केरळमधून येणाऱ्यांना क्वारंटाईन करून त्यांची काही दिवस अधुनमधून चाचण्या करण्यात यावी व चाचणी निगेटिव्ह आल्यास त्यांना प्रवेश द्यावा. 18 वर्षांखालील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस दिलेली नसल्याने त्यांच्यात प्रतिकार शक्ती निर्माण झालेली नाही. त्यामुळे त्यांना चित्रशाळेत प्रवेश दिला जाऊ नये अशी दुसरी शिफारस केली आहे. तज्ज्ञ समितीच्या शिफारशी सरकारने मान्य करण्याचा आदेश यापूर्वीच उच्च न्यायालयाने दिलेला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com