'मी माझ्या डोळ्यांनी मृत्यूंचे तांडव पाहिले'

कृपया ती स्थिती पुन्हा आणू नका; शवचिकित्सक मधू घोडकीरेकर यांची कळकळची विनंती : राजकीय मेळाव्यावर स्वनियंत्रण येण्याची गरज व्यक्त
Goa Covid Case: शवचिकित्सक मधू घोडकीरेकर

Goa Covid Case: शवचिकित्सक मधू घोडकीरेकर

Dainik Gomantak

मडगाव (Goa Covid Case) : कोविडची दुसरी लाट गोव्यात आली त्यावेळी राज्यात मृत्यूने अक्षरशः थैमान घातले होते. दर दिवशी 10 ते 15 लोक मरत होते. ती स्थिती पहिल्यास ते एक मृत्यूंचे तांडवच होते. मी त्याचा भयानक अनुभव घेतला आहे अशी माहिती देताना मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील शव चिकित्सक डॉ. मधू घोडकीरेकर यांनी कृपया पुन्हा तशी पाळी राज्यात आणू देऊ नका अशी कळकळीची विनंती केली.

Goa Covid Case: शवचिकित्सक मधू घोडकीरेकर

66 प्रवाशांना कोरोनाचीची लागण झाल्यानंतर Cordelia Cruise गोव्यावरून मुंबईला परत

मडगावात (Margao) सुरू केलेल्या अद्यावत शवंचिकित्सा केंद्राला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे डॉ. घोडकीरेकर यांनी आज एक स्नेहमेळावा आयोजित केला होता. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी दुसऱ्या लाटे (Covid Second weve) दरम्यान आपल्याला आलेला भयानक अनुभव कथन केला.

डॉ. घोडकीरेकर म्हणाले, त्यावेळी नुकतीच नगरपालिका निवडणूक झाली होती. राजकिय सभामुळे लोक घोळक्याने एकत्र जमत होते. त्याचाच परिणाम म्हणजे राज्यात कोविड झपाट्याने पसरला. लोक पटापट मरू लागले. मागच्या वर्षभरात दक्षिण गोवा इस्पितळात सुमारे 1200 मृतदेहांची चिकित्सा करण्यात आली त्यापैकी सुमारे 800 बळी कोविडच्या दुसऱ्या लाटेतील होते. तो अनुभव अगदी भयानक असा होता. एका दिवशी मी 25 च्यावर मृतदेहही त्या काळात हाताळले आहेत असे त्यांनी सांगितले.

सध्या विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यात काही राजकिय नेत्यांनी शक्ती प्रदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. हजारोंच्या संख्येत लोकांना बोलावून मेळावे घेतले जात आहेत. मागच्या त्या भीषण अनुभवानेही आम्ही शहाणे झाले नाहीत का?

Goa Covid Case: शवचिकित्सक मधू घोडकीरेकर

गोव्याच्या या भागात आज वीज पुरवठा खंडीत

डॉ. घोडकीरेकर म्हणतात, मतदान करून आम्हाला पाहिजे तो लोक प्रतिनिधी निवडून देणे हा आमचा अधिकार आहे. त्यासाठी निवडणूक ही झालीच पाहिजे. मात्र त्या निवडणूकीला जाऊन मतदान करण्यासाठी जिवंत राहणे तेवढेच गरजेचे आहे. उमेदवारांनी आता विचार करायला हवा. सभेला जे कोण येतात ते दुसरे तिसरे कोणी नसून ते त्यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. आपल्या कार्यकर्त्याना असे गमावणे त्यांना चालणार का?

कोविडमुळे (Covid 19) आमची शिक्षण पद्धती बदलली. जे वर्गात शिकवले जायचे ते ऑनलाइन पद्धतीने शिकवले जाऊन विद्यार्थी या नव्या बदलत्या पद्धतीतही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन डॉक्टरसुद्धा झाले. जर शिक्षण पद्धतीत असा बदल घडू शकतो तर राजकीय पद्धतीत तो का होऊ शकत नाही. शेवटी उमेदवारांना आपले म्हणणे काय हे मतदारांपर्यत पोहचवायचे असते. ते आपले म्हणणे ऑनलाइन पध्दतीने मतदारांसमोर पोहोचवू शकत नाहीत का? असा सवाल त्यांनी केला.

दुसऱ्या लाटेच्या वेळी वैदकीय कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी इतर प्रशासकीय यंत्रणा धावून आली होती. मात्र आता निवडणूक असल्याने हे कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यग्र असतील अशा वेळी गोव्यात तिसरी लाट पूर्वीच्याच दाहकतेने आली तर हे कर्मचारी मदतीला मिळणार नाहीत आणि तसे झाले तर वैद्यकीय यंत्रणाही कोलमडून पडू शकते याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com