Goa Corona Update: राज्यात आज 20 नव्या कोरोना रूग्णांची नोंद

नागरिकांनी कोरोना नियम पाळणे आवश्यक
Goa: Covid vaccination
Goa: Covid vaccinationDainik Gomantak

गोव्यात आज दिवसभरात 20 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 6 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील सक्रिय रूग्णांची संख्या कमी झाली असून, सध्याच्या घडीला 102 सक्रिय कोरोना रूग्णांवर (Active Corona Cases in Goa) उपचार सुरू आहेत. त्यामूळे राज्याचा रिकव्हरी रेट 98.41 टक्के झाला आहे.

(goa covid update 20 new patients and 6 discharge)

Goa: Covid vaccination
Mopa Airport : पर्रीकर की बांदोडकर; मोपाला कुणाचं नाव द्यायचं? खलपांनी स्पष्टच सांगितलं

गोवा आरोग्य विभागाच्या (Goa Health Department) वतीने आज दिनांक 1 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 58 हजार 726 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 54 हजार 611 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Goa: Covid vaccination
Goan Food : गोव्यात हमखासपणे खाल्लं जाणारं चवदार फुल

राज्यात आज कोरोनामूळे एकही मृत्यू नाही. तर आजपर्यंत 4,013 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 429 कोरोना चाचणी करण्यात आल्या आहेत. त्यामूळे नागरीकांनी सार्वजनिक ठिकाणी असताना कोरोना नियम पाळणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com