
Panjim: आरोग्य क्षेत्रातील (Health sector) डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी (Doctors & Health Workers) अथक परिश्रम केल्यामुळेच राज्यात कोरोना महामारी (Corona epidemic) नियंत्रणात आली. त्यामुळे त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांचा गौरव करणे आपले आद्य कर्तव्य ठरते. असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Health Minister Vishwjit Rane) यांनी आज केले. तिसवाडी तालुक्यातील चिंबल प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड वॉरीअर्सच्या सत्कार सोहळ्यात राणे बोलत होते (Covide Warriors felicitated Ceremony). यावेळी सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस (MLA Tony Fernanades), आरोग्य संचालक डॉ. जुझे डिसा. रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲड.अमित पालेकर, लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर, आरोग्य अधिकारी डॉ. जुडे डिसोजा आदी मान्यवर उपस्थित होते. (Goa)
कोरोना काळात चांगली कामगीरी करतानाच लसीकरण मोहिमेतही चिंबल आरोग्य केद्रातील (Chimbel Health Center) डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांनी चांगले योगदान दिले, त्याबद्दल आपण सर्वांचे अभिनंदन करत आहे. जनसेवा हेच आपले कर्तव्य असून राज्यातील नागरिकांना चांगल्यात चांगली आरोग्य सेवा पुरवून त्यांचे हित जपण्यास आम्ही कटीबध्द आहोत. असेही आरोग्यमंत्र्यानी पुढे बोलताना सांगितले. मंत्री राणे व आमदार फर्नांडिस यांच्याहस्ते चिंबल आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचारिका व इतर सर्व कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.