Goa Cricket Association: गैरव्यवहाराचे आरोप; GCA चा सामना आता न्यायालयात रंगणार

गोवा क्रिकेट असोसिएशनने माजी सचिवांवर केले आरोप
Court
CourtDainik Gomantak

गोवा क्रिकेट असोसिएशनची (जीसीए) काही दिवसांपुर्वीच निवडणूक पार पडली. ती प्रचंड चुरशीमुळे राज्यभरात चांगलीच चर्चेत आली. यात सत्ताधारी भाजप आणि मगो पक्षातील गटबाजीही सर्वांना पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर गोवा क्रिकेट असोसिएशनने माजी सचिवांवर केलेल्या आरोपांमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

(Goa Cricket Association Demand inquiry in Ex-Secretary Vipul Phadke payment)

मिळालेल्या माहितीनुसार गोवा क्रिकेट असोसिएशन व्यवस्थापकीय समितीने आज एक ठराव केला आहे. या ठरावाद्वारे असोसिएशनने म्हटले आहे की, 6 ऑक्टोबर रोजी माजी सचिव श्री. विपुल फडके यांनी सुरु असलेल्या निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. नियमबाह्यपणे माजी सचिवांनी क्लबला पैसे दिले आहेत. असा आरोप त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे असोसिएशनची निवडणूक झाली तरी पुन्हा चर्चेत येणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

Court
Ponda Crime News: कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने न्यायात अडचणी

आजी सदस्यांनी याबाबत चौकशी करण्यासाठी न्यायमुर्ती राजीव लोचन मेहरोत्रा यांना विनंती केली आहे. तसेच चौकशीसाठी लोकपाल आणि चार्टर्ड अकाउंटंट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात यावी असा एकमताने ठराव करण्यात आला आहे.

Court
Rishab Shetty IFFI 2022: '...तरच कोकणी सिनेमाला येतील सुगीचे दिवस'

गोवा क्रिकेट असोसिएशन आता क्रिकेट खेरीज निवडण चुरशीने चर्चेत आली होती. यानंतर आता गैरव्यवहाराच्या आरोपाचे सामने न्यायालयात रंगणार असल्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे. याबाबत अद्याप विपुल फडके यांनी भुमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे फडके हे या आरोपांचे खंडण करणार की, प्रत्यारोपाच्या फैरी सुरु करणार हे पाहावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com