GCA Election : गोवा क्रिकेट संघटनेची निवडणूक 27 रोजी

कार्यक्रम जाहीर; अध्यक्षासह एकूण सहा पदांसाठी चुरस
Goa Cricket Association Election
Goa Cricket Association ElectionDainik Gomantak

पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) सहा सदस्यीय व्यवस्थापकीय समितीसाठी येत्या 27 ऑक्टोबर रोजी निवडणूक होईल. संघटनेचे निवडणूक अधिकारी डॉ. एम. मोदास्सीर यांनी गुरुवारी सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

जीसीएची नवी व्यवस्थापकीय समिती 2022-2025 या कालावधीसाठी असेल. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत पर्वरी येथील गोवा क्रिकेट अकादमी सभागृहात आमसभेद्वारे निवडणूक प्रक्रिया होईल. त्याच दिवशी संध्याकाळी चार वाजल्यापासून मतमोजणी होईल आणि संध्याकाळी सहा वाजता निवडणूक अधिकारी निकाल जाहीर करतील.

(Goa Cricket Association Election)

Goa Cricket Association Election
Subhash Shirodkar : बैलपार जलप्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार

अध्यक्ष, सचिव, खजिनदार, उपाध्यक्ष, संयुक्त सचिव आणि सदस्य अशा एकूण सहा पदांसाठी निवडणूक होईल. क्लबच्या अध्यक्षाला मतदानाचा हक्क असेल. अध्यक्ष अनुपलब्ध असल्यास त्याच्या जागी त्या क्लबचा सचिव मतदानाचा हक्क बजावू शकेल, त्यासाठी संबंधितांना 22 ऑक्टोबरपर्यंत क्लबच्या अधिकृत पत्रासह निवडणूक अधिकाऱ्याशी संवाद साधावा लागेल. जीसीए निवडणूक अंतिम मतदार यादी संघटनेच्या सूचना फलकावर व संकेतस्थळावर 12 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता जाहीर केली जाईल.

उमेदवारी अर्ज 13 पासून

जीसीए निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज 13 व 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 4 या कालावधीत स्वीकारले जातील. उमेदवारी अर्ज भरलेल्यांची यादी 15 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता जाहीर केली जाईल.

उमेदवारी अर्जांची छाननी 17 ऑक्टोबरला होईल आणि 18 ऑक्टोबर रोजी पात्र उमेदवारांची यादी जीसीए सूचना फलकावर आणि संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. 19 व 20 ऑक्टोबरला दुपारी 12 ते संध्याकाळी 6 या कालावधीत उमेदवारास अर्ज मागे घेता येतील. 21 रोजी पात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com