Goa News: क्रिकेट निवडणुकीतही रंगला राजकीय फड!

Goa News: गोवा क्रिकेट असोसिएशनची 'जीसीए'ची निवडणूक प्रचंड चुरशीची ठरली.
Goa News
Goa NewsDainik Gomantak

Goa News: गोवा क्रिकेट असोसिएशनची (जीसीए) यावेळची निवडणूक प्रचंड चुरशीची ठरली. त्याचवेळी सत्ताधारी भाजप आणि मगो पक्षातील गटबाजीही उघड झाली. चेतन देसाई आणि विनोद (बाळू) फडके या प्रतिस्पर्धी गटांची पाठराखण करताना सरकारमधील मंत्री-आमदारांनी परस्परविरोधी भूमिका घेतली.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चेतन देसाई गटाला माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत, सांगेचे आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई, शिरोड्याचे आमदार तथा मंत्री सुभाष शिरोडकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी उघडपणे पाठिंबा दिला होता.

Goa News
Goa News: राज्य सरकार जेटी धोरणा विरोधात ठाम; विरोधक मात्र आक्रमक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोन्ही गटांशी समान अंतर राखताना आपल्या मर्जीतील रोहन गावस देसाई यांना सचिवपदी बिनविरोध निवडून आणले. चेतन देसाई मागील निवडणुकीत काणकोणमधून काँग्रेस पक्षाच्या तिकिटासाठी इच्छुक होते. त्यांचे समर्थक दया पागी हे काँग्रेसचे कार्यकर्ते, ते खजिनदारपदी निवडून आले.

शंभा देसाई हेसुद्धा चेतन यांच्याप्रमाणे काँग्रेस समर्थक मानले जातात, ते उपाध्यक्षपदी निवडून आले. डिचोलीचे माजी आमदार राजेश पाटणेकर हे भाजपचे जुनेजाणते कार्यकर्ते. त्यांनी चेतन देसाई यांच्यातर्फे निवडणूक लढविली व सर्वाधिक 75 मते मिळवून जिंकून आले.

Goa News
Cancer in Goa : गोव्यासमोर कर्करोगाचं मोठं आव्हान

बिनविरोध सचिव रोहन हे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील व आपण फडके गटाचा असल्याचे जाहीरपणे सांगत होते, मगो पक्ष सत्तेत आहे, मात्र या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचीही तोंडे दोन दिशेला वळली. मंत्री सुदिन ढवळीकर यांचे खंदे समर्थक अनंत नाईक यांनी फडके गटातर्फे निवडणूक लढविली व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत फक्त एका मताने पराभूत झाले. मगोचे डॉ. केतन भाटीकर जीसीए निवडणुकीत चेतन यांच्या गटासाठी आवाजी मुलुखमैदान बनून वावरले.

विपुल यांना फक्त जिंकल्याचे समाधान

माजी अध्यक्ष बाळू फडके यांचे पुत्र विपुल हे फक्त 3 मतांनी अध्यक्षपदी निवडून आले. चेतन यांचे कनिष्ठ बंधू माजी रणजीपटू महेश देसाई यांचा विपुल यांनी पराभव केला. पण संघटनेत चेतन गटाचे बहुमत असल्यामुळे विपुल यांना अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याचेच समाधान लाभले. फडके गट मतदानाचा हक्क असलेल्या 107 पैकी बहुसंख्य क्लबांना प्रभावित करू शकला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com