वेश्‍या व्यवसायप्रकरणात गोवा क्राईम ब्रँचची कारवाई

दैनिक गोमन्तक
बुधवार, 6 जानेवारी 2021

वेश्‍या व्यवसायप्रकरणी दलाल सर्फराज ऊर्फ सलमान झहिर खान क्राईम ब्रँचने काल रात्री हरमल येथे केलेल्या कारवाईत अटक केली.

पणजी: वेश्‍या व्यवसायप्रकरणी दलाल सर्फराज ऊर्फ सलमान झहिर खान (फोंडा) व त्याची साथीदार रेहना ऊर्फ लिमा मुस्कार सय्यद खान (जुने गोवे) या दोघांना क्राईम ब्रँचने काल रात्री हरमल येथे केलेल्या कारवाईत अटक केली.

संशयित सर्फराज याने एका तरुणीला हरमल येथील फेलिक्स हॉटेलात वेश्‍या व्यवसायासाठी रेहना हिच्यासोबत पाठवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक राहुल परब व निरीक्षक सुदिक्षा नाईक यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकांनी या हॉटेलात जाऊन पीडित तरुणीची सुटका केली व तिची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. संशयिताना आज न्यायालयातून पोलिस रिमांड घेण्यात येणार आहे.

आणखी वाचा:

बंगळुरू बलात्कारप्रकरणातील संशयित गोवा सीआयडी क्राईम ब्रँचच्या ताब्यात -

 

संबंधित बातम्या