Fake Call Centre In Goa: गोव्यात फेक कॉल सेंटर; गुजरात, नागालँड येथील सहा जणांना अटक

फेक कॉल सेंटरद्वारे केली जात होती अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक
Fake Call Centre In Goa
Fake Call Centre In GoaDainik Gomantak

Fake Call Centre In Goa: गोव्यात फेक कॉल सेंटरद्वारे अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक केली जात होती. गोवा गुन्हे शाखेने फेक कॉल सेंटरवर कारवाई करत गुजरात आणि नागालँड येथील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. चिंचवाडा, चिंबल येथे आज (दि.24) ही कारवाई करण्यात आली.

(Goa Crime Branch arrested six persons, from Gujarat and Nagaland for running a fake call centre racket and duping citizens from the USA)

Fake Call Centre In Goa
IFFI Goa: कला अकादमी फक्त नावालाच; अपुऱ्या स्क्रीन व विक्रमी नोंदणीमुळे इफ्फीचं नियोजन गंडलं

आकाश पांचोली (28), थ्रेम्हो केचिंगबा (23), सनम रिंग्सा बथरी (23), आनंद सुजीत सेंगयुंग (26), लायरीम मोनमोहन होजाई (19) आणि हेमरिंग सोनाई गिरिसा (22) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सहाही आरोपी अहमदाबाद आणि नागालँड येथील रहिवाशी आहेत.

Fake Call Centre In Goa
Goa IFFI 2022: गुंतवणूकदारांच्या अपेक्षांचा सिनेमांवर परिणाम होतो- अभिनेत्री लासिया नागराज

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चिंचवाडा, चिंबल येथे फेक कॉल सेंटर चावलत होते. गुन्हे शाखेला याबाबत माहिती मिळताच त्यांनी याठिकाणी छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. संशयित आरोपी, कर्ज आणि वैद्यकीय बिलाच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून सहा लॅपटॉप, मोबाईल फोनसह तब्बल दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com